Rajlakshan Rajyog : ज्योतिषशास्त्रात ग्रहांना विशेष महत्व आहे. ग्रहांच्या हालचालींचा पृथ्वीसह मानवी जीवनावर देखील परिणाम होतो. नऊ ग्रहांमध्ये सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो, म्हणूनच जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा परिणाम १२ राशींच्या लोकांवर दिसून येतो. ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो.
दरम्यान, नोव्हेंबर प्रमाणेच डिसेंबर महिन्यात देखील आपली राशी बदलणार आहे. १६ डिसेंबरला सूर्य धनु राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर सूर्य नवव्या दृष्टीत दिसेल. इतकेच नाही तर देवगुरु गुरु मेष राशीत स्थित आहे. अशा स्थितीत गुरुची सूर्यावर शुभ दृष्टी पडत आहे. यामुळे एक दुर्मिळ राजयोग तयार होत आहे जो अनेकांसाठी लाभदायक ठरणार आहे.
ज्योतिषांच्या मते १६ डिसेंबरला सूर्याच्या राशी बदलामुळे राजलक्षण राजयोग तयार होणार आहे. तब्बल 12 वर्षांनंतर हा योग तयार होत आहे. त्यामुळे हा योग अत्यंत शुभ मानला जात आहे. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा राजयोग तयार होतो त्याला अधिक मान-सन्मान आणि यशही मिळते. तसेच त्याला आर्थिक फायदाही होतो. एवढेच नाही तर या लोकांचे व्यक्तिमत्वही सुधारते.
राजलक्षण राजयोगाचा ‘या’ राशींना होईल फायदा !
धनु
धनु राशीच्या लोकांसाठी हा योग शुभ सिद्ध होईल. हा योग खूप लाभदायक ठरणार आहे. या योगामुळे लोकांचा आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक काम पूर्ण होईल. जीवनात आनंद येईल. पैसा मिळेल. वैवाहिक जीवनात येणारे अडथळेही दूर होतील. कुटुंबात शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. घर किंवा कार खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण करू शकता.
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी राजलक्ष्णा राजयोग खूप फलदायी मानला जात आहे. या योगामुळे मेष राशीच्या लोकांना अपार यश मिळेल. सध्या तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळेलच, शिवाय इतर क्षेत्रातही तुम्ही यशाला स्पर्श करू शकाल. नोकरी बदलणाऱ्या लोकांसाठी हा काळ शुभ राहील. परदेश प्रवासाच्या संधी निर्माण होत आहेत. कायदेशीर बाबींतून दिलासा मिळेल. पैसा मिळेल. समाजात आणि घरात मान-सन्मान वाढेल. वाहने, मालमत्ता इत्यादी खरेदी करण्याची चांगली संधी मानली जाते. प्रेमाच्या बाबतीतही तुम्हाला या काळात यश मिळेल.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी राजलक्ष्णा राजयोग आनंद घेऊन येणारा असेल. या राजयोगामुळे लोकांना नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. लोक अमाप संपत्तीचे मालक बनू शकतात. त्यांना पैशाची कमतरता भासणार नाही. या लोकांना त्यांच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. हे लोक कुठेतरी जाण्याचा विचार करू शकतात. मात्र, खर्चावर थोडे नियंत्रण ठेवावे लागेल. पण तुम्ही भरपूर कमाई कराल. व्यवसायात प्रगतीचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.