भारतातील ‘या’ 3 सेफ्टी कारच्या किंमती वाढणार ! जानेवारी 2024 पासून लागू होणार नवे दर

Ahmednagarlive24 office
Published:

Car Price Hike : येत्या काही दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर अनेक लोक नवीन वाहन खरेदी करणार आहेत. जर तुम्हीही नवीन वर्षात कार खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एका अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे नवीन वर्षात भारतातील अनेक ऑटो कंपन्यांनी आपल्या गाड्यांच्या किमती वाढवल्या आहेत. यामुळे नवीन वर्षात कार खरेदी करणे महाग होणार आहे.

2024 च्या सुरुवातीलाच महागाईमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी फॉक्सवैगन, ऑडी, मारुति सुजुकी, महिंद्रा, टाटा मोटर्स, सिट्रोएन, एमजी मोटर इंडिया, BMW India सह देशातील अनेक नामांकित कारनिर्मात्या कंपन्यांनी नवीन वर्षात आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती वाढवण्याचे जाहीर केले आहे.

यामुळे नवीन वर्षात कार खरेदी करणाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. यामुळे जर तुम्हाला या कंपन्यांच्या गाड्या खरेदी करायच्या असतील तर नवीन वर्ष सुरू होण्याआधीच कार खरेदी करावी लागणार आहे. कारण की, या कंपन्यां जानेवारी 2024 पासून आपल्या गाड्यांच्या किमती वाढवणार आहेत. अशातच आता स्कोडा ऑटो इंडिया या दिग्गज ऑटो कंपनीने देखील आपल्या सर्व प्रकारच्या वाहनांच्या किमती वाढवण्याचे जाहीर केले आहे.

यामुळे निश्चितच कार घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसणार आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये कारच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आणि येत्या नवीन वर्षात यामध्ये आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे यामुळे कार घेणे आता सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर जाणार की काय अशी भीती आहे. दरम्यान आता आपण स्कोडा कंपनीने नवीन वर्षात वाहनांच्या किमती किती वाढवण्याचे जाहीर केले आहे हे जाणून घेणार आहोत.

काय म्हणतेय स्कोडा ऑटो इंडिया

एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, स्कोडा ऑटो इंडिया 1 जानेवारी 2024 पासून तिच्या प्रवासी वाहनांच्या श्रेणीतील किमती वाढवणार आहे. म्हणजे स्कोडाच्या स्कोडा स्लाव्हिया, कुशाक आणि कोडियाक यांसारख्या सुरक्षित कारच्या किमती वाढणार आहेत. कंपनी त्यांच्या सर्व प्रकारच्या वाहनांची किंमत दोन टक्क्यांनी वाढवेल असा दावा केला जात आहे.

स्कोडाच्या गाड्या महाग होणार असल्याने ज्यांना या कंपनीची कार खरेदी करायची असेल त्यांना आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. विशेष म्हणजे कंपनीच्या माध्यमातून या वाढलेल्या किमती जानेवारी 2024 पासून लागू केल्या जातील अशी माहिती देण्यात आली आहे. स्कोडा ऑटोने एका निवेदनात म्हटले आहे की, वाढत्या पुरवठा, इनपुट आणि ऑपरेशन खर्चामुळे किमती वाढवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe