तुम्ही खात असलेला मासा ताजा आहे की शिळा? वापरा ‘या’ टिप्स आणि ओळखा माशाची क्वालिटी

Published on -

समाजामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन प्रकारचे लोक आढळतात. जे लोक मांसाहारी असतात ते प्रामुख्याने  चिकन, मटन आणि मासे यांचा आहारामध्ये मोठ्या प्रमाणावर वापर करत असतात. यामध्ये मासे खाणारे लोक देखील मोठ्या प्रमाणावर असतात व खूप मोठ्या प्रमाणावर आवडीने मासे खाल्ले जातात.

आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील माशांमध्ये असलेले काही पौष्टिक गुणधर्म फायद्याचे ठरतात. त्यामुळे माशांची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु बरेच जण जेव्हा मासे खरेदी करायला जातात तेव्हा ते फ्रेश आहेत की शिळे हे पाहत असतात. परंतु बऱ्याचदा आपला इतका गोंधळ होतो की आपल्याला ते कळतच नाही.

काही मासे विक्रेते हे शिळा मासा देखील विक्रीला ठेवतात. परंतु आपल्याला तो ओळखता येत नाही. अशा प्रकारचा शिळा मासा जर तुम्ही खाल्ला तर आरोग्याच्या काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे होणारा त्रासापासून वाचायचे असेल तर तुम्ही खरेदी करत असलेला मासा ताजा आहे की शिळा हे ओळखता येणे खूप गरजेचे आहे.

याच दृष्टिकोनातून या लेखात आपण काही महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत ज्या माध्यमातून तुम्ही मासा ताजा आहे की शिळा हे आरामात ओळखू शकणार आहात.

 या टिप्स वापरा आणि ओळखा मासा फ्रेश आहे की शिळा

1- माशांच्या डोळ्यांचे निरीक्षण– जेव्हा तुम्ही मासा खरेदी कराल तेव्हा त्याच्या डोळ्यांचे निरीक्षण करून तुम्ही मासा फ्रेश आहे की शिळा हे ओळखू शकतात. यामध्ये तुम्ही माशांच्या डोळ्यांचे निरीक्षण करत असताना तुम्हाला माशांच्या डोळ्यांवर पांढरा थर किंवा डोळे बुडलेले दिसले तर तो मासा शिळा आहे असे समजावे. ताज्या माशाचे डोळे चमकदार आणि फुगीर असतात. जर तुम्हाला डोळ्यांवर पांढरे थर दिसून आले तर तो मासा शिळा किंवा खराब झाला आहे असे समजावे.

2- माशांचा वासावरून ओळख यामध्ये अनेक तज्ञ म्हणतात की मासा ताजा आहे की शिळा हे ओळखण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे. आपल्याला माहित आहेच की माशांना एक विशिष्ट प्रकारचा वास येत असतो. बऱ्याच जणांना तो वास माहिती आहे.

परंतु तुम्ही खरेदी करत असलेल्या माशाचा वास कायम येत असलेल्या वासापेक्षा जर थोडासा वेगळा  येत असेल तर तुम्हाला तो ओळखता येणे गरजेचे आहे. माशाला कोणत्याही प्रकारचा वास नसावा. जर माशांमध्ये काही दुर्गंधी येत असेल असे जर तुम्हाला वाटले तर तुम्ही समजावे की तो मासा खराब झाला आहे. असा पद्धतीचा मासा घरी आणल्यावर देखील त्याचा खूप खराब वास येतो.

3- माशांचे फुफ्फुस मासे ताज्या आहेत हे जर तुम्हाला खात्री करून घ्यायची असेल तर माशांचे कल्ले उचलावे आणि त्यांचा आतील भाग चमकदार लालसर गुलाबी रंगाचा आहे का हे तपासून पहावे. तसे पाहायला गेले तर मासा ताजा असेल तर अशा माशांना थोडासा ओला पोत असतो व ते कोरडे होत नाहीत.

4- मासे खरेदी करताना ते तपासून घ्यावेत मासे खरेदी करताना त्याचा पोत पाहणे गरजेचे असून जो मासा ताजा असतो त्याचा बाह्यव अंतर्गत पोत दोन्ही बाजूंनी मजबूत असतो. तसेच ताजे मासे चमकदार आणि स्वच्छ दिसतात व त्यांची त्वचा कडक व खवलेयुक्त असते.

मासा जर शिळा असेल तर तो निर्जीव दिसतोस परंतु त्याची त्वचा देखील सैल झालेली असते. तसेच मासे खरेदी करताना त्यांचे कल्ले आणि शेपटी ताजे दिसत आहेत की नाही याची देखील खात्री करा. माशांची एकूण रचना थोडी निसरडी असणे गरजेचे आहे. जेव्हा ताजा मासा कापला जातो तेव्हा त्यातून नेहमी रक्तस्त्राव होत असतो व ते दिसायला चमकदार गुलाबी रंगाचे असते.

 अशा पद्धतीने तुम्ही या सोप्या गोष्टींचे निरीक्षण करून मासा ताजा आहे की शिळा हे चटकन ओळखू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe