Car Loan Interest Rate : लोक त्यांच्या ड्रीम कारसाठी खूप मेहनत करतात आणि पैसे वाचवतात, पण जर त्यांना काही रक्कम कमी पडली तर ते कर्ज घेऊन त्यांचे स्वप्न साकार करतात, परंतु कार लोन घेण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, जसे की कोणती बँक कोणत्या दारात कर्ज देत आहेत, तसेच कर्जावर कोणत्या सवलती देत आहेत का? इत्यादी…
कार लोन घेताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, सर्व बँकांच्या व्याजदरांची तुलना केली पाहिजे. जेणेकरून तुम्हाला स्वस्त कार कर्ज मिळू शकेल. आज आम्ही तुम्हाला अशा काही बँका सांगणार आहोत ज्या सध्या स्वस्त दरात कार लोन देत आहेत. तसेच अनेक यावर अनेक सवलती देखील मिळत आहेत, अशातच जर तुम्ही सध्या नवीन वर्षात स्वतःसाठी कार घेण्याचा विचार करत असाल ही संधी तुमच्यासाठी चांगली ठरेल.
कार लोनसाठी प्रोसेसिंग फी बहुतेक बँकांकडून आकारली जाते. पण, अशा काही बँका अजूनही शून्य प्रक्रिया शुल्कावर कार कर्ज देत आहेत. इंडियन बँक, एसबीआय आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून शून्य प्रक्रिया शुल्कावर कार कर्ज दिले जात आहे. त्याच वेळी, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांच्याकडून प्रक्रिया शुल्कावर 100 टक्के सूट दिली जात आहे.
कमी व्याजदरात कर्ज देण्याऱ्या टॉप बँका :-
इंडियन बँक – 8.60 टक्के पासून सुरू
स्टेट बँक ऑफ इंडिया – 8.65 टक्के पासून सुरू
बँक ऑफ महाराष्ट्र – 8.70 टक्के पासून सुरू
सेंट्रल बँक ऑफ इंडिया – 8.70 टक्के पासून सुरू
कॅनरा बँक – 8.70 टक्के पासून सुरू
UCO बँक – 8.70 टक्के पासून सुरू
बँक ऑफ इंडिया – 8.75 टक्के पासून सुरू
IDBI बँक – 8.75 टक्के पासून सुरू
बँक ऑफ बडोदा – 8.75 टक्के पासून सुरू
CSB बँक – 8.75 टक्के पासून सुरू
पंजाब नॅशनल बँक – 8.75 टक्के पासून सुरू
युनियन बँक ऑफ इंडिया – 8.75 टक्के पासून सुरू
HDFC बँक – 8.80 टक्के पासून सुरू
पंजाब आणि सिंध बँक – 8.85 टक्के पासून सुरू
इंडियन ओव्हरसीज बँक – 8.85 टक्के पासून सुरू
लक्षात घ्या कर्जाचा व्याजदर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असतो. जर तुमचा क्रेडिट स्कोअर 750 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला कमी व्याजदराने कर्ज मिळण्याची शक्यता जास्त आहे.