Ahmednagar breaking : महिलेचे दागिने चोरणारा आरोपी गजाआड करण्यात आला आहे. सचिन लक्ष्मण ताके (रा. उंदिरगाव, ता. श्रीरामपूर, जि. अ.नगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीस संगमनेर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

संगमनेर येथील उषा अशोक लोंगानी या नातवाला घेवून घराकडे जात असताना एका मोटारसायकलवर दोन अज्ञात इसम आले. त्यांनी लोंगानी यांचे दोन तोळा वजानाचे दागिने बळजबरीने चोरून पोबारा केला.
३२ हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते. ही घटना २० नोव्हेंबर २०२३ रोजी भरदुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी संगमनेर पोलिस ठाण्यात भादविकच्या ३९२, ३४ प्रमाणे दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरील गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेजचा आधार घेतला. त्या आधारे सचिन ताके या आरोपीवर संशयाची सुई गेली. आरोपीस चांदणी चौक येथे पकडण्या आले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
राजेंद्र भिमा चव्हाण उर्फ पप्पु घिसाडी (रा. श्रीरामपूर) याच्या मदतीने गुन्हा केल्याचे आरोपीने सांगितले. जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधिक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली
स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. दिनेश आहेर, पोहेकॉ. मनोहर गोसावी, संतोष लोंढे, पोना. रविंद्र कर्डिले, पोना. संदिप चव्हाण, गणेश भिंगारदे, संतोष खैरे, पोकॉ. रणजित जाधव, रोहित मिसाळ, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, अरुण मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.