Ahmednagar News : बँकेच्या जाचाला कंटाळून एकाची आत्महत्या, चिठ्ठीत मनसे नगरसेवक वसंत मोरेंचे नाव आल्याने सर्वच हैराण

Published on -

अहमदनगरमधून एक आत्महत्येसंदर्भात बातमी आली आहे. धकाकदायक गोष्ट म्हणजे त्यात एका राजकीय नेत्याचे अर्थात नगरसेवकाचे नाव असल्याने एकच खळबळ उडाली आहे. मोहन आत्माराम रक्ताटे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याने लिहिलेल्या चिठ्ठित मनसे नगरसेवक वसंत मोरेच्या नावाचा उल्लेख आहे.

मोहन याने खासगी बँकेच्या जाचाला कंटाळून रविवारी (१० डिसेंबर २०२३) आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान “माझे दोन हफ्ते थकल्याने संबंधित बँकने माझा टेम्पो जमा करून कोणतीही नोटीस न पाठवता माझ्या परस्पर विकला, वसंत मोरेच मला न्याय मिळवून देतील” असे चिठ्ठीत लिहिलेलं असल्याचे समजते.

मोहन यांनी मालवाहू टेम्पो विकत घेण्यासाठी एका खासगी बँकेकडून कर्ज घेतले होते. त्यांचे कर्जाचे दोन हफ्ते थकले होते. त्यामुळे बँकेने त्यांचा टेम्पो जमा करून घेतला. त्यांनतर मोहन यांच्या परस्पर टेम्पो बँकेने विकला असल्याचे म्हटले जात आहे.

कोणतीही नोटीस न देता बँकेने टेम्पो विकला आणि जातीवाचक शिवीगाळ केली यामुळे मोहन यांनी आत्महत्या केली अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेची महिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पंचनामा करताना तदेहाजवळ चिठ्ठी साडपली. यात मन्ससह नगरसेवक वसंत मोरे यांचे नाव होते. “माझे दोन हफ्ते थकल्याने संबंधित बँकने माझा टेम्पो जमा करून कोणतीही नोटीस न पाठवता माझ्या परस्पर विकला, वसंत मोरेच मला न्याय मिळवून देतील” असे चिठ्ठीत लिहिले होते.

मोहन याने मालवाहू टेम्पो खरेदी केल्यानंतर काही काळातच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि महिन्याभरातच टेम्पोलाही अपघात झाला होता. दुरुस्ती व इतर कारणाने टेम्पो दोन महिने जागेवरच राहिला असल्याने त्यांना ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात बँकेचा हफ्ता भरता आला नाही.

बँकेने मोहन यांचा टेम्पो जमा करत कारवाई केली. टेम्पो विकून बाकीचे हफ्ते भरून टाकण्याचा मोहन यांनी विचार केला. परंतु बँकेसोबाबत व्यवहार जुळला नाही. मग त्यानंतर त्यांनी मित्राकडून पैसे घेऊन कर्ज फेडण्याचा विचार केला पण येथेही बँकेने टाळाटाळ केली अशी माहिती सुसाइड नोटमध्ये आहे.

मनसेचे पुण्याचे नगरसेवक वसंत मोरे हेच आपल्याला न्याय देतील असे चिठ्ठीत लिहिलेय. दरम्यान वसंत मोरे यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेत संबंधित खासगी बँकेविरोधात गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याची विनंती केली असून गुन्हा दाखल न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करू असेही सांगितल्याचे समजते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News