Ahmadnagar Breaking : पेटवून दिलेला अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह तालुक्यातील पठार भागातील रणखांब गावामध्ये काल शनिवारी (दि.१६) दुपारी आढळला आहे.
संगमनेर तालुक्यातील रणखांब गावामध्ये बाळासाहेब दिघे यांच्या शेतालगत वनविभागाचे क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह अर्धवट जळालेला आढळला.

Ahmadnagar Breaking
या मृतदेहाच्या अंगावर कपडे नव्हते. डोक्याचे केस अर्धवट जळालेले होते. चेहरा, छाती आणि कमरेवर भाजून जखमा झालेल्या दिसत होत्या. काल शनिवारी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास सापडलेला मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
याबाबत साहेबराव बाबुराव वारघे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा घातपाती मृत्यू असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून पुढील तपास पोलीस करीत आहे.