कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली ! कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला

Ahmednagarlive24 office
Published:
Health News

Health News : देशात गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यातच आता या विषाणूच्या नव्या उपप्रकाराचे रुग्णदेखील आढळत आहेत. केरळात कोविडच्या जेएन.१ सब-व्हेरिएंटचा एक रुग्ण आढळला आहे. अलीकडेच तामिळनाडूत देखील या उपस्वरूपाचा रुग्ण आढळला होता.

केरळातील ७९ वर्षीय एका महिलेच्या नमुन्याची १८ नोव्हेंबर रोजी आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली होती. ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. या महिलेला फ्लू सारख्या आजाराची लक्षणे होती.

यापूर्वी तिला कोरोना होऊन गेला होता. तिच्या नमुन्याचे जिनोम सिक्वेंसिंग केले असता तिला कोरोनाच्या जेएन.१ सब-व्हेरिएंटची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वी सिंगापूरमध्ये एका भारतीयाला जेएन.१ व्हेरिएंटची लागण झाल्याचे आढळले होते.

हा व्यक्ती तामिळनाडूच्या तिरुचिरापल्लीचा रहिवासी आहे. यानंतर तामिळनाडूतही या व्हेरिएंटचे काही रुग्ण आढळले; परंतु रुग्णसंख्येत वाढ झाली नाही. सद्यः स्थितीला केरळवगळता देशात इतरत्र कुठेही जेएन.१ व्हेरिएंटचा रुग्ण नाही.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यतच्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाच्या ३३९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची सक्रिय रुग्णसंख्या १४९२ इतकी आहे. यांपैकी ९० टक्क्यांहून अधिक रुग्णांची स्थिती अगदी सामान्य असून ते घरातच विलगीकरणात आहेत. कोरोनाचा जेएन. १ व्हेरिएंट सर्वप्रथम लक्झमबर्गमध्ये आढळला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe