Ration Shop: तुम्हाला रेशन दुकानातून धान्य मिळण्यात अडचण निर्माण होते का? पैसे देऊन देखील कमी धान्य मिळते? या ठिकाणी करा तक्रार

Ajay Patil
Published:
ration shop update

Ration Shop:- केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या काही स्वस्त धान्य पुरवठ्याच्या योजना राबवल्या जातात त्या प्रामुख्याने रेशन कार्ड च्या माध्यमातून नागरिकांना दिल्या जातात. परंतु बऱ्याचदा आपल्याला दिसून येते की जेव्हा आपण स्वस्त धान्य दुकानावर धान्य घ्यायला जातो तेव्हा आपल्याला कमी प्रमाणामध्ये धान्य दिले जाते किंवा पैसे जास्त घेऊन धान्य कमी दिले जाते असे बऱ्याचदा दिसून येते.

तसेच अशा दुकानांमधून हे धान्य दुसऱ्या ठिकाणी जास्त भावात विकण्याचे प्रकार देखील बऱ्याचदा घडून येतात. आपल्याला माहित आहे की या स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून सार्वजनिक अन्नधान्य वितरण यंत्रणेअंतर्गत  नागरिकांना गहू, तांदूळ इत्यादी सारखे जीवनावश्यक धान्य हे स्वस्त दरामध्ये पुरवले जाते.

परंतु काही रेशन दुकानदार हे लाभार्थ्यांना या वस्तू देण्यासाठी टाळाटाळ करतात. यामध्ये नागरिकांना धान्य कमी देऊन जास्त पैसे घेणे तसेच नवीन रेशन कार्ड बनवून देण्यास टाळाटाळ करणे तसेच धान्य कमी देणे इत्यादी प्रकार आपल्याला दिसून येतात. यामध्ये सामान्य नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते.

अशा पद्धतीचेच प्रकार तुमच्या बाबतीत देखील घडत असतील तर आता काळजी करण्याची गरज नसून या पद्धतीच्या काही गोष्टी तुमच्याशी घडत असतील तर तुम्ही आता थेट ऑनलाईन पद्धतीने याची तक्रार करू शकणार आहात.

 अशा पद्धतीने करू शकता तुम्ही ऑनलाईन तक्रार

यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, केंद्र सरकारच्या माध्यमातून आता प्रत्येक राज्याला रेशन तक्रारींकरिता हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आलेले असून जर तुम्हाला देखील रेशन कार्डवर कमी धान्य मिळत असेल किंवा रेशन वितरक यांच्या विरोधात काही तुमची समस्या किंवा तक्रार असेल तर व त्याशिवाय नवीन रेशन कार्ड मिळण्यामध्ये अडचण निर्माण करण्यात येत असेल

किंवा अनावश्यक  पैशांची मागणी होत असेल तर तुम्ही आता सरकारच्या टोल फ्री क्रमांकावर अगदी घरी बसून यासंबंधीची ऑनलाईन तक्रार करू शकणार आहात. तुम्ही केलेल्या तक्रारीची दखल आता थेट तहसील कार्यालयाच्या माध्यमातून घेतली जाणारा असून त्यासंबंधीची कार्यवाही केली जाणार आहे. तुम्ही सरकारच्या संकेतस्थळावर देखील या संबंधीची तक्रार नोंदवू शकणार आहात. तक्रारी करता तुम्ही सरकारची वेबसाईट…

https://mahafood.gov.in/pggrams/entrygrv.aspx या वेबसाईटवर ऑनलाईन तक्रार नोंदवू शकणार आहात. त्याशिवाय तुम्ही  महाराष्ट्रमध्ये रेशन कार्ड संबंधित काही तक्रार असेल तर 1967/1800224950 या टोल फ्री क्रमांकावर देखील तुमची तक्रार नोंदवू शकणार आहात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe