अहमदनगर :- वंजारगल्लीतील दंगलीच्या गुन्ह्यात बहुजन समाज पक्षाचे नगरसेवक मुदस्सर जहांगीर शेख यांच्यासह शंभरहून अधिक जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
गाडीला कट मारल्याच्या वादातून शुक्रवारी वंजारगल्ली येथे दोन गटसमोरासमोर येऊन दगडफेक झाली. त्यात दोन्ही गटांतील सात जण जखमी झाले होते.

याप्रकरणी सुरुवातीला पोलिस कर्मचारी बाळकृष्ण दौंड यांच्या फिर्यादीवरून दोन्ही गटातील ६० जणांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न करणे (कलम ३०७), जीवितास धोका निर्माण करणे (कलम ३०८), दंगल करणे या कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता.
दोन्ही गटांच्या परस्परविरोधी फिर्यादी.
वैभव संजय होंडे याच्या फिर्यादीवरून साबीर सादीक सय्यद, तन्वीर पठाण, जमील इबू शेख, निसार शेख, अल्ताफ शेख, शानू सय्यद, तौफिक लाला शेख, नुरमोहम्मद जरुद्दीन शेख, फरदिन सय्यद, अल्ताफ शकील सय्यद, आबिद रफीक शेख, इरफान शेख, नदीम शकील सय्यद, नगरसेवक मुदस्सर जहांगीर शेख यांच्यासह इतर १५ जणांविरुध्द जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तर तन्वीर पठाण याच्या फिर्यादीवरून जोशी वस्ताद, विशाल होंडे, मयूर सतीश मैड, बंडू ऊर्फ ससनी मुर्तडकर, अदित्य गवळी, रोहित फंड ऊर्फ रोड्या, गोपाळ मालवानी, राकेश वाडेकर, सौरभ न्हावरे, सतीश मैड, वैभव होंडे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.