शेतमालाला बाजारभाव नसल्याने अडचणीत आलेल्या शेतकरी दुधाच्या कमी दरामुळे तसेच खुरकाच्या वाढत्या किमतीमुळे मेटा कुटीला आला असल्याने शेतमालाला तसेच दुधाला हमीभाव तसेच शेतीसाठी पूर्ण दाबाने वीजपुरवठा मिळावा या मागणीसाठी घारगाव ग्रामस्थांनी घारगाव येथे सोमवार दि.१८ आमरण उपोषण सुरू केले.
दुभत्या जनावरांना लागणाऱ्या खुराकांचे भाव स्थिर न राहता गगनाला भिडले त्यामुळे शेतकरी हा दुधाच्या जोडधंद्यामुळे कर्जाच्या विळख्यात सापडला असल्याने दुधाला भाव मिळावा,

त्याचबरोबर कांदा, ऊस, कापूस, सोयाबीन, भाजीपाला इ. या शेतकऱ्यांच्या प्रत्येक शेतमालाला हमी भाव द्यावा तसेच शेतीसाठी पूर्ण दाबाने वीजपुरवठा मिळावा या घारगाव ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले.
यावेळी बापूसाहेब निंभोरे (मेजर), भूषण बडवे, महेश पानसरे, संगीता खामकर, शरदराव जगताप, रमेश खोमणे, राजेंद्र थिटे, अनिलराव मोळक, संतोषराव पानसरे, दादासाहेब साबळे (मेजर), शंकर थिटे, सावळा खामकर, आण्णासाहेब खोमणे शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवित उपोषणाला पाठिंबा दिला.













