Ahmednagar News : शहर सहकारी बँक बोगस कर्ज प्रकरण : मर्दा तोंड उघडेना, ‘ती’ माहिती देईना..पोलीस कोठडी वाढवली

Ahmednagarlive24 office
Published:

शहर सहकारी बँकेतील बोगस कर्ज प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली. दरम्यान या प्रकरणातील आरोपी सीए विजय मर्दाला अटक करण्यात आली होती.

आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने मागील आठवड्यामध्ये विजय मर्दा व कदम यांना ताब्यात घेत अटक केली होती. या दोघांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

दरम्यान आरोपी डॉ. नीलेश शेळके याचे सगळे व्यवहार सीए विजय मर्दाला माहीत असूनही तो तोंड उघडत नाहीये. त्यामुळे त्याची पोलीस कोठडी वाढवली असून २० डिसेंबरपर्यंत आता ही पोलिस कोठडी वाढवली आहे.

मुख्य आरोपी शेळके व सीए विजय मर्दा यांच्यात आर्थिक व्यवहार पूर्वीपासूनच आहेत. त्यांनी २००८ मध्येच केडगाव येथे एकत्रित प्लॉटचा व्यवहार केलेला आहे.

यातील काही महत्वाचे धागेदोरे तसेच अपहार केलेली रक्कम कुठे व केलेल्या रकमेची शेळके कशी विल्हेवाट लावली,

याबाबत मर्दा यालाच माहीत असून तसेच दोषारोपपत्रासोबत दाखल केलेल्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मर्दा याचा सहभाग आहे असे समोर आल्याचे समजते.

हा अहवालही न्यायालयास सादर करण्यात आलेला आहे. याशिवाय मर्दाने मदत केल्याची एक व्हिडीओ क्लिपही पोलिसांना मिळाली आहे.

दरम्यान मर्दा हा पोलिसाना काही माहिती देत असून आणखी पाच दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी पक्षाने केली होती.

दरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत आरोपीला २० डिसेंबर पर्यंत दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

पोलिसांना आणखीही एकाचा शोध

डॉ. नीलेश शेळके याच्यासह इतरांनी बोगस कर्ज प्रकरण करून अपहार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

परंतु हे सर्व बँकिंग क्षेत्रातील माहितीगाराशिवाय शक्य नसल्याचे सरकारी पक्षाचे म्हणणे आहे. दरम्यान तो माहितीगार कोण याचा पोलिस शोध घेत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe