अर्बन बँक एकटे दिलीप गांधीच चालवत होते का ? षडयंत्र व राजकारण नेमके काय ?

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : काही लोकांनी ठेवीदार असल्याचे सांगून नगर अर्बन बँकेच्या मुख्य शाखेतील बँकेचे माजी चेअरमन व माजी खासदार दिवंगत दिलीप गांधी यांच्या फोटोची अहवेलना केली.

राजकीय आकस व वयक्तिक द्वेषाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीकडून दिवंगत व्यक्ती विषयी घडलेली ही घटना अत्यंत लज्जास्पद आहे. ही बँक एकटे दिलीप गांधीच चालवत होते का?

बँकेतील पदाधिकारी व संचालक देखील होते. असे असताना फक्त गांधी परिवरलाच का टार्गेट केले जात आहे. मोर्चा देखील फक्त गांधी यांच्याच घरावर का? यामागील षडयंत्र व राजकारण नेमके काय ? असा प्रश्न पडतो, असा सवाल बँकेच्या व्हा. चेअरमन दीप्ती गांधी यांनी केला.

बँकेकडे आज ४०७ कोटी रुपयेची रोख असून, त्यातून ३२० कोटी ठेवींचे खात्यातील रक्कमा देणे बाकी आहे. हे सदरील पैसे देऊन बँकेकडे ८७ कोटी रुपये बाकी राहणार आहे.

इतकेच नव्हे तर मुदल अधिक व्याज असे एकूण ८०० कोटी रुपये कर्जदारांकडून येणे बाकी आहे. तसेच बँकेची स्वमालकीची १९ शाखांची मालमत्ता सुमारे १०० कोटींची आहे. सदरील आकडेवारी वरून बँक कोणत्या स्थितीत बंद करण्यात आली. हे लक्षात येते.

स्व. खासदार गांधी यांची जनमानसातील प्रतिमा खराब करण्यासाठीच अश्या प्रकारे प्रकार काही ठराविक समाजकंटकांकडून केले जात आहेत. सदरील प्रकरणात खरच त्यात किती ठेवीदार होते व नेमक्या त्यांच्या ठेवी अडकलेल्या आहेत का? याची शहानिशा करून लवकरात लवकर संबंधितांर कायदेशीर कारवाई करावी यासाठी पावले उचलली जाणार असल्याचे सौ. गांधी यांनी सांगितले.

हे पण वाचा : अहमदनगर ब्रेकिंग : आजीचा खून करणाऱ्या बापाला पोटच्या पोरानेच संपविले ! आईनेच दिली मुलाविरोधात फिर्याद

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe