Breaking : माझ्यावरील हल्ला हा पूर्व नियोजित कट होता. भाजपाच्या लोकप्रतिनिधी यांच्या घरी मढी देवस्थानच्या विश्वतांची मिटींग झालेली आहे. माझ्यावर जिवघेणा हल्ला झाला, पोलिसही दबावाखाली काम करीत आहेत.
वाढीव कलम लागण्यासाठी मी न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती मढीदेवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड यांनी दिली. येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत मरकड बोलत होते.
या वेळी भाजपाचे ओबीसी सेलचे प्रमुख गोकुळभाऊ दौंड, अंबादास आरोळे, देवीदास मरकड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी बोलताना मरकड म्हणाले, मी मढी गावचा सर्वांगिण विकास केला, हेच काही लोकांना पाहवत नाही.
देवस्थान समितीमध्ये मी कोणताही गैरकारभार करु देत नाही म्हणून हे सर्व षडयंत्र रचले गेले आहे. १० डिसेंबर २०२३ रोजी राजळे यांच्या घरी विश्वस्तांची बैठक झाली, तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास सर्व समजेल.
बेकायदेशीरपणे अध्यक्षपादावरून हटविले होते; परंतू पुन्हा अध्यक्षपदी निवड झाली. मी याबाबत भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले असून, त्यांची भेटही घेणार आहे. न्यायायलयातही जाणार आहे.
दौंड यांच्या नेतृत्वाखाली यापुढेही काम करीत राहणार, मी मागे हटणारा नाही. या वेळी बोलताना लोकप्रतिनिधीं अन्याय करीत आहेत. भाजपाच्या वरिष्ठांकडे दाद मागितली जाईल.
येणाऱ्या २०२४ निवडणुकीत जनताच जाब विचारेल. हे बरे नाही. भाजपात केवळ लाभार्थी असणारे कार्यकर्ते काहींच्या जवळ राहिले आहेत. मरकड यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत.
मढी देवस्थानच्या विश्वस्तपदी निवड झालेले मरकड हे गेल्या वीस वर्षात भांडतच राहिले आहेत. त्यामुळे देवस्थानचा विकास खोळंबला आहे. मी न्यायालयात जाऊन मढीतील मरकडांपैकी कोणीच विश्वस्त नको, तेथे न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकाची निवड करावी.
न्यायपालिकेच्या ताब्यात अथवा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती निवडावी, अशी मागणी करणार असल्याची माहिती संजय मरकड यांनी दिली आहे. देवस्थानच्या घटनेत असे कुठेच नाही की, मरकड यांना संधी द्यावी. एक जिल्हा न्यायालयाचा निकाल आहे, त्याला स्थगिती येऊ शकते, असे मरकड म्हणाले.