राजेंद्र नागवडे झाले आक्रमक ! म्हणाले हे सरकार शेतकरीविरोधी असल्याने…

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : शेतकऱ्यांच्या बाजूचे निर्णय घेण्यासाठी सरकारला वेळ नसून शेतकऱ्यांविरुद्ध निर्णय घ्यायचा असेल तर रात्रीत घेतला जात असून, हे सरकार शेतकरीविरोधी असल्याने शासनाला

शेतकरी प्रश्नांबाबत शासनाला जाग आणण्यासाठी शेतकऱ्यांनी लढा उभारत हक्काची जाणीव करून देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नागवडे कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले.

शेतीला तसेच दुधाला हमीभाव मिळावा, यासाठी कोळगाव फाटा येथे शेतकऱ्यांनी बुधवारी (दि.२०) रोजी रास्ता रोको आंदोलन करत रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध व्यक्त केला. या वेळी राजेंद्र नागवडे बोलत होते.

पुढे बोलताना नागवडे यांनी, शेतीमालाला बाजार भाव नसतानाच शेतीसाठी लागणाऱ्या खतांचे बाजार गगनाला भिडले आहेत. कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असतानाच शासनाने ४० टक्के कर आकारणी करून निर्यातबंदी केल्याने कांद्याचे बाजार कमी झाले.

दुधाचीदेखील परिस्थिती वेगळी नसल्याचे सांगत शेतीला जोड धंदा म्हणून शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन दूध व्यवसाय सुरू केला. मात्र, दुधाचे बाजार कमी झाल्याने शेतकऱ्यांने मोठे नुकसान होऊन शेतकरी अडचणीत आला आहे.

पीक विम्याचा नावाखाली सरकार फक्त शेतकऱ्यांकडून पैसे घेत आहे. कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांना आले नसल्याने शेतकऱ्यांची घोर फसवणूक होत असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला तसेच दुधाला हमीभाव मिळावा,

यासाठी आंदोलने करण्याची वेळ आली असल्याचे सांगत हक्काची मागणी केल्यावर सरकार शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करत त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत सरकारचा निषेध केला.

या वेळी श्रीगोंदा तहसीलदार हेमंत ढोकले यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारत शेतकऱ्यांच्या भावना शासन दरबारी कळविण्याचे आश्वासन दिले.

या वेळी माजी सरपंच हेमंत नलगे, बाजार समिती संचालक नितीन डुबल, नागवडे कारखाना संचालक शरद जगताप, बाळासाहेब नलगे, मच्छिद्र सुपेकर, विजय नलगे, नंदकुमार लगड, कल्याण नलगे, विश्वास थोरात,

मच्छिद्र नलगे, सुभाष लगड, चिमण बाराहाते, संकेत नलगे, सागर नलगे, सुनील नलगे, सचिन निंबाळकर, हिरामण पवार, उत्तम लगड, सतीश लगड, ओंकार नलगे, अप्पासाहेब भापकर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe