आ. सत्यजीत तांबेही आता फडणवीस आणि गडकरी यांच्या यादीत

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : आमदार होण्याच्या आधीपासूनच थेट लोकांमध्ये उतरून त्यांच्याशी संवाद साधणारे सत्यजीत तांबे सोशल मीडियावरूनही सातत्याने लोकांच्या संपर्कात असतात. त्यांना आवडलेली एखादी गोष्ट, अर्थसाक्षरता,

राजकारणातील साक्षरता, लोकसहभाग अशा विविध विषयांवर ते त्यांच्या YouTube चॅनलवर अभ्यासू मतं मांडतात. विशेष म्हणजे तरुणाईलाही सत्यजीत तांबे यांची मतं मांडण्याची पद्धत, सोशल मीडियावरील त्यांचा वावर भूरळ पाडतो.

त्यामुळेच युट्युब चॅनलवर सत्यजीत तांबे यांचे दोन लाखांहून अधिक सबस्क्रायबर झाले आहेत. युट्युबने त्यांना सिल्व्हर बटण पाठवून दिलं. विशेष म्हणजे आ. सत्यजीत तांबे जनसामान्यांच्या प्रश्नांना नागपूर अधिवेशनात सभागृहात वाचा फोडत असतानाच

नागपूरमध्येच हे सिल्व्हर बटण त्यांना मिळालं. कौतुकाची बाब म्हणजे राज्यातील सर्व तरुण आमदारांपैकी यु्ट्युबवर स्वत:चं चॅनल सुरू करून सिल्व्हर बटण मिळवणारे सत्यजीत तांबे हे पहिलेच आमदार आहेत.

त्यांच्या आधी खासदार नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार अमोल कोल्हे अशा नेत्यांनाच हा बहुमान मिळाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe