Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील कर्मचाऱ्यांना आता वेतनासाठी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडता येणार आहे. तसा शासन निर्णय निर्गमित झाला असल्याची माहिती शिक्षक भारती संघटनेने राज्यसचिव तथा शिक्षक नेते सुनील गाडगे यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी शिक्षकांचे पगार हे राष्ट्रीयीकृत बँकेतच होत होते. परंतु, मध्यंतरी हे पगार जिल्हा सहकारी बँकेत होऊ लागले. पगार राष्ट्रीयीकृत बँकेत सीएमपी प्रणालीद्वारे झाले, तर एक कोटीपर्यंत अपघात विमादेखील मिळतो.

त्यामुळे पगार राष्ट्रीयीकृत बँकेतच व्हावेत, यासाठी शिक्षक भारती संघटनेने पाठपुरावा केला. आता दोन दिवसांपूर्वी शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक काढून शिक्षकांना वेतनासाठी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्यास स्वातंत्र्य दिले आहे.
राष्ट्रीयीकृत बँकेत वेतनाचे खाते असेल तर बँकांकडून कर्मचाऱ्यांचा विमा उतरविला जातो. त्यामुळे अशा बँकांत खाते उघडण्याबाबत शिक्षक भारती संघटनेने प्रारंभपासून पाठपुरावा केला होता, प्रसंगी आंदोलन करून शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, संचालक, आयुक्त, शिक्षक आमदार, सचिव अशा अनेक ठिकाणी प्रश्न मांडला.
त्याला अखेर न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे , जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षा सौ आशा मगर, सोमनाथ बोंतले, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, जिल्हासचिव विजय कराळे, उर्दू जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे जिल्हा कार्याध्यक्ष किशोर डोंगरे,
जिल्हा सचिव महेश पाडेकर, संभाजी पवार, कार्यवाह संजय भुसारी, हनुमंत रायकर, नवनाथ घोरपडे, सुदाम दिघे, सिकंदर शेख. संजय पवार, संतोष देशमुख, किसन सोनवणे, कैलास जाधव, संतोष शेंदुरकर, संभाजी चौधरी, श्रीकांत गाडगे,
रेवण घंगाळे जॉन सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुज, छाया लष्करे, जया गागरे, अनघा सासवडकर, रूपाली बोरुडे, सोनाली अकोलकर, विनाअनुदानितच्या अध्यक्षा रूपाली कुरूमकर आदींना सांगीतले आहे.