Basket stars : जिवंत जीव कि जाळे समजणेही कठीण ! शरीरात अनेक हात आणि पाय…

Published on -

Basket stars : लांबून पाहिले तर जाळेच वाटावे, पण जवळून पाहिल्यावर अनेक हात आणि पाय दिसतात. आणि त्याची हालचाल सुरू असते. जाळे म्हणजेच बास्केट स्टार्स हा एक समुद्री जीव असल्याचे दिसते.

समुद्राचे जग खरोखरच विचिन्त्र आहे, त्यात बरेच प्राणी राहतात. अनेकांबद्दल अद्याप आपण अनभिज्ञ आहोत. बास्केट स्टार्स हा असाचा प्राणी आहे, ज्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा सागरी प्राणी दिसायला खूपच विचित्र आहे. तो जाळ्यासारखा दिसतो, परंतु जवळून पाहिल्यावर त्याच्या शरीरात अनेक हात आणि पाय असल्याचे दिसतात आणि ते हालचालही करतात.

हा व्हिडीओ ‘सायन्स गर्ल’ नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये झाडाच्या मुळासारखा प्राणी दिसत आहे, जो एक व्यक्ती हातात धरून दाखवतो. जवळून पाहिल्यावर या प्राण्याचे शेकडो हात-पाय हलताना दिसतात.

बास्केट स्टार्स इचिनोडर्म समूहाशी संबंधित आहे. त्यात स्टारफिश, समुद्री अर्चिन यांचादेखील समावेश होतो. बास्केट स्टार्स कुठल्याही परिस्थितीत राहू शकतो. उथळ भरती-ओहोटीपासून खोल समुद्राच्या तळापर्यंत ठिकाणी, परिस्थितीत तो राहू शकतो.

वेगवान वाहणाऱ्या प्रवाहात राहणे त्यांना आवडते. जेथे ते त्यांचे हात पसरू शकतात. हा समुद्री जीव ३५ वर्षे जगतो. त्यांचे वजन ५ किलोग्रॅम (११ पौंड) पर्यंत असते. बास्केट स्टार्सला अनेक हात असतात, ज्यात लहान तीक्ष्ण हूक असतात, ज्याद्वारे ते शिकार पकडतात. या विचित्र प्राण्याचा व्हिडीओ १५ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News