Ahmednagar News : अहमदनगर शहरात पूर्वीच्या लोकांना विकासाचे काही देणे घेणे नव्हते. लोकांना विकासच माहित नव्हता, गेल्या ७ ते ८ वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या योजना शहरात आणण्यात यशस्वी झालो.
आता कुठे लोक विकासावर बोलू लागले आहेत. विकासावर आरोप-प्रत्यारोप होत असल्याने समाधान वाटते. महापालिकेच्या आचारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी पहिल्यांदा २०१७-१८ मध्ये ठराव झाला होता.
नंतरच्या काळात वारंवार पाठपुरावा सुरू होता, आज पुतळ्याचे लोकार्पण झाले असून, पुतळा पुढील पिढयांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे, असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
अहमदनगर महापालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनारूढ पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगे, आयुक्त डॉ. पंकज जावळे, रणरागिणी
पुढे ते म्हणाले की, महापालिकेच्या महापौरपदावर बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाटते की, शहराच्या विकासाला दिशा दिली पाहिजे, कारण शेजारी छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे ही शहरे विकसित झाली.
नगर शहराचा विकास कधी असा प्रश्न होता. शहराच्या विकासासाठी आपण काही तरी केले पाहिजे. याच हेतून विधानसभेत गेल्यानंतर केंद्र व राज्य सरकारच्या योजना आणण्यात यशस्वी झालो.
पाणी, कचरा, गटार हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी यशस्वी प्रवल केले. छत्रपती पुतळ्याचे लोकार्पण झाले असले तरी, छत्रपती संभाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिचा फुले पुतळ्यांचे कामेही अंतिम टप्यात आले आहेत, असे आ. जगताप यांनी सांगितले