Tata च्या ‘या’ लोकप्रिय कारची किंमत वाढली, आता ग्राहकांना 10 हजार रुपये अधिक मोजावे लागणार

Tata Car Price Hike : टाटा ही देशातील एक प्रमुख ऑटो कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. यामध्ये टाटा अल्ट्रोज या गाडीचा देखील समावेश होतो. या गाडीची लोकप्रियता आपल्या देशात खूपच अधिक आहे. विशेषतः तरुण वर्गाला या गाडीचे डिझाईन आणि पावरफुल इंजिन विशेष आकर्षित करीत आहे.

मात्र जर तुम्ही ही गाडी खरेदी करण्याचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे या गाडीच्या काही वॅरियंटची किंमत आठ हजारापासून ते दहा हजारापर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान आता आपण टाटा अल्ट्रोज या हॅचबॅक कारच्या कोणत्या वैरिएंटची किंमत वाढवण्यात आली आहे आणि कोणते Varient बंद झाले आहे याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या वैरिएंटची किंमत वाढली

टाटा अल्ट्रोज XM Plus MT या वैरिएंटची किंमत दहा हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे. आधी या गाडीची किंमत सात लाख 44 हजार 900 रुपये एवढी होती. आता मात्र या वेरियंटची गाडी सात लाख 54 हजार 900 रुपयांना मिळत आहे. XM Plus (S) MT वैरिएंटची किंमत देखील दहा हजार रुपयांनी वाढली आहे. हे वैरिएंट आधी सात लाख 89 हजार 900 रुपयांना उपलब्ध होते.

आता मात्र यासाठी सात लाख 99 हजार 900 रुपये एवढी रक्कम मोजावी लागत आहे. त्यासोबतच XT MT वैरिएंटची किंमत देखील आठ हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे. आधी याची किंमत 7,99,900 एवढी ठेवण्यात आली होती. आता मात्र ही किंमत आठ हजार रुपयांनी वाढून आठ लाख सात हजार नऊशे रुपये एवढी झाली आहे. याशिवाय टाटा अल्ट्रो चे काही व्हेरियंट बंद देखील झाले आहेत.

कोणते वैरिएंट झालेत बंद

टाटा अल्ट्रोजचे XE Plus MT, XT Dark MT, XTA Dark AMT हे तीन वैरिएंट कंपनीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता ग्राहकांना टाटा अल्ट्रोजचे हे बंद वैरिएंट शोरूम मध्ये उपलब्ध होणार नसल्याचे सांगितले जात आहे. आता तुम्हाला हे वैरिएंट घ्यायचे असतील तर तुम्हाला सेकंड हॅन्ड मार्केटमध्येच या वैरिएंटची गाडी उपलब्ध होणार आहे.