Ahmednagar News : रेल्वेत चेन का असते? विनाकारण चेन ओढणाऱ्यांवर काय होते कारवाई? अहमदनगरमध्ये वर्षभरात चेन ओढणाऱ्यांवर किती झाल्या कारवाया? पहा

Ahmednagarlive24 office
Published:

रेल्वेमधील असणारी चेन हा अनेकांच्या औत्सुक्याचा विषय. अनेकांना ही चेन का असते हेच माहित नसते. रेल्वे प्रवासामध्ये काही आपत्कालीन स्थिती ओढवली तर तात्काळ रेल्वे थांबवण्यासाठी या चेनचा उपयोग केला जातो. परंतु जर विनाकारण चेन ओढली तर मोठा दंड देखील बसतो. आजवर विनाकारण चैन ओढणाऱ्यांवर अनेक कारवाया झाल्या आहेत. त्यातून हजारोंचा दंड वसूल केला गेला आहे.

 रेल्वेत का असते चेन? :- रेल्वेच्या प्रत्येक बोगीमध्ये आपत्कालीन स्थितीमध्ये गाडी थांबविण्यासाठी चेन लावलेली असते. खिडकीच्या वरच्या बाजूला ही चेन असून आपत्कालीन स्थितीत सहजासहजी ही चेन ओढून रेल्वेचालकाला सूचना देऊ शकतो. त्यामुळे तत्काळ गाडी थांबविण्यात येते. १३९ क्रमांकावरील रेल्वे हेल्पलाइनची देखील मदत घेता येते. त्यावरून कोणत्याही स्थानकावर मदत पोहोचविली जाते.

 विनाकारण चैन ओढल्यास काय होईल ? :- अनेकदा लोक विनाकारण चेन ओढून गाडी थांबवितात. रेल्वे पोलिस येऊन चेन ओढलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी करतात. कोणत्या परिस्थितीत चेन ओढली गेली याची खातरजमा केली जाते. विनाकारण धावत्या रेल्वेमध्ये चेन ओढल्याचे सिद्ध झाल्यास एक हजार रुपये दंड आणि सहा महिने कारावास अशी शिक्षा आहे. वेळ प्रसंगी दोन्ही शिक्षा एकत्रित होऊ शकते. एखाद्या प्रवाशाने हे जर वारंवार केले तर चार हजार रुपये दंड आणि दोन वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

 अहमदनगर जिल्ह्यात विनाकारण चेन ओढणाऱ्यांवर तब्बल ९३ कारवाया :- अहमदनगर जिल्ह्यात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर नगर, बेलापूर, कोपरगाव, अकोलनेर, श्रीगोंदा आदी स्थानकावरून नगरमधील प्रवासी प्रवास करत असतात. मागील वर्षभरात विनाकारण चेन ओढण्याच्या गुन्ह्यांत रेल्वे पोलिसांनी ९३ कारवाया केल्या आहेत. विनाकारण चेन ओढत गाडी थांबविल्यावरून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती निरीक्षक सतपाल रेरा यांनी दिलीये.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe