बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांकडे आहेत सर्वात महागड्या कार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :-  बॉलिवूड जगातील जवळजवळ प्रत्येक स्टार्सना वेगवेगळे छंद असतात. यापैकीच एक छंद म्हणजे महाग आणि शाही वाहनांचा वापर करणे. अमिताभ बच्चन ते सलमान खान पर्यंत या सर्वांना आलिशान गाड्यांची प्रचंड आवड आहे.

चला आज जाणून घेऊया कोण आहे कोणत्या कारचा मालक. बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानकडे लक्झरीयस वाहनांचा जबरदस्त स्टॉक आहे. सलमानकडे टोयोटाची 2 कोटींपेक्षा अधिक किमतीची लक्झरी कार, 3.15 कोटीची लँड रोव्हर रेंज वोग, ऑडी आर 8, ऑडी क्यू 7 अशी वाहने आहेत. आमिर खानकडे 10 कोटी रुपयांची मर्सिडीज एस 600 आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि मुकेश अंबानी यांच्यानंतर ही कार फक्त आमिरखान कडे आहे. संजय दत्त याच्याकडे 3 कोटी रुपयांची फेरारी 599 जीटीबी आहे.

अक्षय कुमार याची आलिशान गाड्यांविषयीची आवड सर्वश्रुत आहे. त्याच्याकडे मर्सिडीज बेंझ, बेंटली, पोर्श कॅनी आणि फेरारी यासारख्या मोटारी आहेत. अमिताभ बच्चन यांच्याकडेही महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे.

या सर्वांमध्ये रॉल्स रॉयस फैंटम ही त्यांची आवडती गाडी असून त्याची किंमत साडेतीन कोटी आहे. शाहरुख खानकडे लक्झरीयस गाड्यांची कमी नाही. त्याच्याकडे Bugatti वेरॉन कार आहे.

या कारची किंमत 12 कोटी आहे. अजय देवगण यांच्याकडे Maserati Quattroporte नावाची कार आहे. या वाहनाची किंमत 1.4 कोटी आहे.

सनी लिओनी Maserati कार ची मालकीन आहे. त्याची किंमत दीड कोटी आहे. रणबीर कपूरकडेही वाहनांची कमतरता नाही, परंतु ऑडी आर 8 चालविणे त्यांना आवडते, ज्याची किंमत सुमारे 2 कोटी रुपये आहे.

अमायरा दस्तूरने नुकतीच तिची ड्रीम कार खरेदी केली. अमायराने मर्सिडीज GLC गाडी खरेदी केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment