नगर – पाथर्डी रोडवरील चाँदबिबी महालाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या रस्ता अपघातात एका वृध्दाचा मृत्यू झाला. नंदकुमार दामोदर साबळे (वय ६२, रा. भगुर ता. शेवगाव) असे मयत वृध्दाचे नाव आहे.
सदरची घटना गुरूवारी (दि. २१) घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.नंदकुमार दामोदर साबळे यांचा गुरूवारी चाँदबिबी महालाजवळ रस्ता अपघात झाला.

Chandbibi Mahal
त्यांना त्यांचे नातेवाईक रवींद्र पवार यांनी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
त्यांनी नगर तालुका पोलिसांना दिलेल्या माहितीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस अंमलदार महेश भवार करीत आहेत.