अहमदनगर ब्रेकिंग : जुगार खेळताना सहा जणांना रंगेहाथ पकडले ; गुन्हा दाखल

Published on -

राहुरी तालुक्यातील गुहा शिवारातील नगर- मनमाड महामार्गावरील हॉटेल मैत्री येथे जुगार खेळताना व खेळवित असताना सहा आरोपींना अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून रंगेहाथ पकडले. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील हवालदार रणजीत पोपट जाधव यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, गुरुवारी (दि.२१) डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास राहुरी तालुक्यातील गुहा शिवारातील नगर-मनमाड महामार्गावरील हॉटेल मैत्री या ठिकाणी पथकाने छापा टाकला.

तेथे काळे-पिवळे नावाचा हारजीतचा जुगार सुरू होता. त्याठिकाणी पथकाने छापा टाकून सहा जुगार खेळणाऱ्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडून ३६ हजार रुपयांची रोकड व ३७ हजार रुपयांचे मोबाईल फोन, असा एकूण ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी हवालदार रणजित जाधव यांच्या फिर्यादीवरून प्रशांत सुनिल शेजवळ (रा. शिर्डी भिंगनगर, ता. राहाता), हर्षद जयसिंग पाटणकर (रा. हॉटेल मैत्री, गुहा शिवार, ता. राहुरी), महमंद आयुब रौफ खान (रा. हॉटेल मैत्री, गुहा शिवार, ता. राहुरी), महंमद कमल महमंद अलाउद्दीन शेख (रा. हडफसर पुणे),

अन्वर अल्लाबक्श शेख (रा. नालासोपारा, मुंबई), इस्तीयाअहमद शफीक खान (रा. मुंबई सेंट्रल) या सहा जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुनिल निकम करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!