शेतकऱ्यांनी ‘त्या’ जागेची खरेदी- विक्री करू नये – आ. राम शिंदे

Published on -

कर्जत तालुक्यातील नियोजित एमआयडीसीच्या नियोजित जागेची पाहणी करण्यासाठी दि.२२ डिसेंबर रोजी औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते, या अधिकाऱ्यांनी कोंभळी, थेरगाव, रवळगाव, वालवड, सुपा तसेच कर्जत, पठारवाडी, अळसुंदा, देऊळवाडी सिद्धटेक, या जागांची पाहणी केली.

कर्जत तालुक्यातील नियोजित एमआयडीसीच्या नियोजित जागेच्या पाहणीचा अहवाल शासनाला आठ दिवसांत सादर करण्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार प्रा. राम शिंदे यांच्या अधिवेशनादरम्यान झालेल्या बैठकीत ठरले होते.

त्या अनुषंगाने रविवार, (दि.१७) रोजी कर्जत येथे आ. प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य यांचे प्रादेशिक अधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, नागरिकांसमवेत बैठक झाली होती.

त्यामध्ये प्रामुख्याने नागरिकांमधून ६ जागा सुचवण्यात आल्या होत्या. या जागांची दि.२२ डिसेंबर रोजी औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. कर्जत तालुक्यातील नियोजित औद्योगिक वसाहतीच्या जागेचा अहवाल शासनास त्वरीत सादर होणार आहे.

त्यामुळे पुढील कामास आता वेग येणार असून, लवकरच जागेवर शिक्कामोर्तब होऊन औद्योगिक वसाहतीसाठी मंजुरी घेऊन हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागेल. शेतकऱ्यांनी नियोजित जागेची खरेदी- विक्री करू नये, असे आवाहन आ. राम शिंदे यांनी केले आहे.

अशी माहितीभाजपा तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी दिली. पाहणी पथकाबरोबर कोंभळी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, भाजपा कर्जत तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, स्वप्निल तोरडमल, गणेश पालवे, रमेश अनारसे, जिजाबापू अनारसे, पंडित अनारसे आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News