गुड न्यूज ! मुंबईत ‘या’ ठिकाणी म्हाडा तयार करणार हजारो 1 BHK फ्लॅट ; सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न होणार पूर्ण

Published on -

Mumbai Mhada News : अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आता सर्वसामान्यांना घर घेणे म्हणजे मोठ्या कष्टाचे बनले आहे. घरांच्या वाढलेल्या किमती पाहता घर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहे.

विशेषतः राजधानी मुंबई पुणे नवी मुंबई ठाणे नासिक पिंपरी चिंचवड नागपूर यांसारख्या महानगरात करांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे या महानगरांमध्ये घर घेणे म्हणजेच आता स्वप्नापल्ल्याड गोष्ट बनली आहे.

अशा परिस्थितीत या महानगरांमध्ये घर घेऊ ईच्छिणारे बहुतांशी लोक म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची वाट पाहत असतात. जर तुम्हीही त्यातलेचं एक असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची अन आनंदाची बातमी समोर आली आहे.

विशेषतः राजधानी मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही बातमी खास राहणार आहे. कारण की, म्हाडाच्या माध्यमातून मुंबईतील एका पॉश ठिकाणी लवकरच हजारो घरांची उपलब्धता करून दिली जाणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, शीव कोळीवाडा येथे असलेल्या गुरू तेगबहादूर नगरामधील सरदार नगर या एकेकाळी असलेल्या निर्वासातींच्या 11 एकरवरच्या वसाहतीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय म्हाडाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

मात्र हे काम म्हाडा ‘कन्स्ट्रक्शन ॲण्ड डेव्हलपमेंट एजन्सी’कडून करणार आहे. पण म्हाडाला यासाठी शासनाची परवानगी लागणार आहे. अशा परिस्थितीत माडाच्या माध्यमातून याबाबतचा सविस्तर प्रस्ताव राज्य शासन दरबारी मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे.

जर मायबाप शासनाने म्हाडाच्या या प्रस्तावाला मान्यता दिली तर या ठिकाणी म्हाडाला तब्बल 1,000 पेक्षा जास्त घरे एक रुपया देखील न लावता मिळणार आहेत. विशेष म्हणजे जानेवारी 2024 अखेरपर्यंत या प्रकल्पासाठी निविदा काढण्यासाठी म्हाडाकडून प्रयत्न होणार आहेत.

हा प्रकल्प तब्बल 2930 कोटी रुपयांचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. दरम्यान आता म्हाडाच्या या प्रस्तावाला सरकारकडून लवकरात लवकर मान्यता मिळते का आणि याचे काम खरचं नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सुरू होणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe