Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा तसा मोठा. राजकीय असो किंवा इतर घडामोडी या देखील मोठ्याच. परंतु अलीकडील काळात गुन्हेगारी घटना देखील मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. अत्याचार,
बालविवाह, मारहाण आदी गुन्हे अलीकडील काळात घडले आहेत. परंतु आता एक जो प्रकार अहमदनगर जिल्ह्यातून समोर आला आहे त्याने सगळेच शॉक झाले आहेत. एका दाम्पत्यास बाळ झालं.
पण त्यानंतर जे उघडं झालं त्याने बाळाच्या वडिलांसह आजोबांवरही गुन्हा दाखल झाला. पहा काय हे प्रकरण –
जिला बाळ झालं ती मुलगी सातवी वर्गात असताना तिची शाळेतील मुलासोबतच मैत्री झाली. दोन वर्षानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले व पुढील काही गोष्टींतून ती अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. कुटुंबीयांना समजलं पण त्यांनी इतर काही गोष्टी न करता दोघांचेही लग्न लावून दिले.
परंतु ज्यावेळी त्या मुलीची पुणे येथे प्रसूती झाली त्यावेळी ती मुलगी अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. त्यामुळे डॉक्टरांनी लगेच पोलिसांना कळवले. पोलिसांनी तेथे येत चौकशी केली. त्यानंतर पालकांवर बालविवाहाचा व त्या मुलावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडित मुलगी ही संगमनेर मधील एका आश्रम शाळेत शिकत होती. पाचवीत असताना तिची ओळख शाळेतीलच विद्यार्थ्यांसोबत झाली. दोघांमध्ये सुरूवातीला मैत्री झाली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले.
पीडित मुलगी सातवी वर्गात शिक्षण घेत असताना त्या दोघांनी तेथून पळ काढला आणि ते संगमनेर तालुक्यातील साकूर मांडवे येथे राहणाऱ्या एका परिचिताच्या घरी राहण्यासाठी गेले. दीड ते दोन महिने ते एका ठिकाणी राहत होते.
या ठिकाणीच दोघांमध्ये शारिरीक संबंध निर्माण झाले आणि ती गर्भवती राहिली होती. मुलीला दिवस गेले असल्याची माहिती समजल्याने दोघांचाही पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथे साध्या पद्धतीने विवाह लावून देण्यात आला होता.
पण डॉक्टरांच्या निदर्शनास हे सगळे आल्याने ही घटना समोर आली. त्यानुसार कारवाई करण्यात आली. या धक्कादायक घटनेतील मुलगा तसेच दोन्हीकडील पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती घारगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांनी दिली आहे.
शाळेतून लैंगिक शिक्षण देण्याची गरज आहे का?
सोशल मीडियाच्या माध्यमातून मुले चुकीच्या गोष्टी पाहत आहेत. त्यामुळे अशा चुकीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे आता शाळेमधून लैंगिक शिक्षण देणे गरजेचे झाले असून लैंगिक शिक्षण विज्ञाननिष्ठ पद्धतीने शिकवल्यास व दुष्परिणाम काय होतात, हे शिकवल्यास अशा घटना घडणार नाहीत असे मत तज्ञ व्यक्त करत आहेत.