Jaggery Tea Benefits : थंडीच्या दिवसात शरीराला आतून गरम ठेवण्यासाठी अनेक पदार्थ खाल्ले जातात. काही लोक मोठ्या प्रमाणात चहाचे देखील सेवन करतात. तसेच अनेकांना गुळाच्या चहाचे सेवन करायलाही आवडते. गूळ आणि चहाचे मिश्रण केवळ चवीलाच चांगले नाही तर ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. पण दररोज याचे सेवन करणे सुरक्षित आहे का? याच्या सेवनामुळे काही आरोग्य समस्याही उद्भवतात का? आजच्या या लेखात आपण याबद्दल महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग…
रोज गुळाचा चहा पिणे सुरक्षित आहे का?
तज्ञांच्या मते, दररोज गुळाचा चहा पिणे फायदेशीर आहे, विशेषत: हिवाळ्यात. गुळाचा स्वभाव उबदार असल्यामुळे हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यास मदत होते. त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम सोबत फॉलिक अॅसिड, लोह आणि मॅग्नेशियम देखील असते. हे सर्व पोषक घटक शरीराला रोगांपासून वाचवण्यास मदत करतात. पण लक्षात ठेवा की तुम्ही गुळाचा चहा जास्त प्रमाणात घेऊ नये. तसेच, रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने अॅसिडिटी किंवा बद्धकोष्ठता सारख्या समस्या उद्भवू शकतात.
थंडीच्या दिवसांत गुळाचा चहा पिण्याचे फायदे :-
-गुळाच्या चहामध्ये असलेले पोषक तत्व शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकून डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करतात. याशिवाय याच्या सेवनाने पचनक्रियाही वेगवान होते.
-गुळाचा चहा घेतल्याने शरीरात ऊर्जाही टिकून राहते. हे चयापचय वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.
-गुळाचा चहा शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवून वजन कमी करण्यास मदत करतो. याचे सेवन केल्याने शरीरातील अतिरिक्त कॅलरीजही कमी होऊ लागतात.
-गुळाचा चहा गरम असल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळण्यास मदत होते.
टीप : लक्षात घ्या गुळाचा चहा फायदेशीर असला तरी त्याचे जास्त प्रमाणात सेवन तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशास्थितीत त्याचे जास्त प्रमाणात सेवन टाळावे.