Ahmednagar News : ‘पुन्हा तेढ निर्माण करणारी वक्तव्ये न करण्याची हमी’ ! कालीचरण महाराजांची नगरच्या उपविभागीय दंडाधिकार्‍यांसमोर हजेरी

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : कालिपुत्र कालीचरण महाराज हे त्यांच्या वक्तव्याने नेहमीच चर्चेत असतात. हेट स्पीच प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी कालिपुत्र कालीचरण महाराज यांनी

चार दिवसांपूर्वी (दि.20 डिसेंबर) रात्री उशिरा नगरच्या उपविभागीय दंडाधिकार्‍यांसमोर हजेरी लावून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती समजली आहे. पुन्हा तेढ निर्माण करणारी वक्तव्ये न करण्याची हमी त्यांनी दिली. समर्थकांची गर्दी टाळण्यासाठी गोपनीय पद्धतीने ही प्रक्रिया पार पाडल्याचे समजले आहे.

14 डिसेंबर रोजी 2022 रोजी नगर शहरात सकल हिंदू समाजातर्फे हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते. या मोर्चाला कालिपुत्र कालीचरण महाराज आणि गुजरातमधील काजलदीदी हिंदुस्थानी हे देखील उपस्थित राहिले होते.

त्यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले होते. हेट स्पीच प्रकरणी सरकारने कारवाई करावी, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. त्यानुसार कालीचरण महाराज यांनी मोर्चानंतर झालेल्या सभेत दोन धर्मीयांमध्ये तेढ निर्माण होईल,

असे वक्तव्य केल्याची फिर्याद दिलेली होती. त्यानुसार कालीचरण महाराज उर्फ अभिजीत धनंजय सराग यांच्यावर 5 महिन्यानंतर गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्ह्याची कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासनाने त्यांना समक्ष हजर राहण्याची नोटीस दिली होती. समर्थकांची गर्दी टाळण्यासाठी कालीचरण महाराज यांनी चार दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात उपविभागीय

दंडाधिकारी तथा प्रतांधिकार्‍यांसमोर रात्री उशिरा हजेरी लावली व कायदेशीर प्रक्रिया पार पाडली. प्रक्रिया पार पाडणे आवश्यक असल्याने कालीचरण महाराज यांच्याकडूनही समर्थकांना याबाबत कळवण्यात आले नव्हते अशी माहिती समजली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe