Silk Farming: युवा शेतकऱ्याने धरली रेशीम शेतीची कास! वर्षाकाठी मिळवत आहेत 6 लाख उत्पन्न

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Silk Farming:- सध्या जे काही तरुण शेतीमध्ये येत आहेत ते पारंपारिक शेती पद्धती व पिकांची लागवड यांना फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अनेक फळबागा तसेच विदेशी भाजीपाल्यांची लागवड, शेतीला वेगवेगळ्या प्रकारच्या जोडधंद्यांची साथ देत आपल्या आर्थिक प्रगती करताना दिसून येते.

फळबागांमध्ये ड्रॅगन फ्रुट पासून तर स्ट्रॉबेरी पर्यंत  आणि इतर फळबागांप्रमाणे सफरचंद लागवड देखील तरुणांनी यशस्वी करून दाखवलेली आहे. शेतीच्या वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत तरुण आता आर्थिक समृद्धीच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर वाटचाल करताना आपल्याला दिसून येत आहेत.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण परतुर तालुक्यातील आनंदगाव येथील अभिजीत शिंदे या तरुणाचा विचार केला तर यांनी रेशीम शेतीच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्रगती साधली आहे. साधारणपणे या व्यतिरिक्त या गावांमध्ये अनेक तरुण शेतकऱ्यांनी रेशीम शेतीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे आर्थिक प्रगती केली आहे. याबाबतचीच यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 रेशीम शेतीतून साधली आर्थिक समृद्धी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सध्या जर आपण शेतीची स्थिती पाहिली तर निसर्गाचे अवकृपा आणि बाजारपेठेत कायमच बऱ्याच शेती पिकांचे घसरलेले बाजारभाव इत्यादी मुळे शेती ही परवडेनाशी झाली आहे. परंतु या सगळ्या संकटांवर आणि परिस्थितीवर मात करत परतुर तालुक्यातील आनंदगाव येथील युवा शेतकरी  अभिजीत शिंदे यांनी रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला व दहा वर्षांपूर्वी त्यांनी अडीच एकरामध्ये तुतीची लागवड करून रेशीम उत्पन्न घेण्याला सुरुवात केली.

या कामी लक्ष्मण सोळंके नावाच्या या क्षेत्रातील तज्ञ शेतकऱ्यांची त्यांनी मदत घेतली व त्यांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना लाभले. मागील दहा वर्षापासून ते रेशीम उत्पादन घेत असून एका वर्षांमध्ये ते सात ते आठ बॅच घेतात. एका बॅचला सरासरी एक लाख रुपये उत्पन्न त्यांना मिळते.

याकरिता वर्षभर त्यांना नियमितपणे दोन मजूर आणि रेशीम कोष काढण्यासाठी शेवटच्या दोन दिवसांसाठी दहा ते बारा महिला मजुरांची आवश्यकता भासते. एका बॅचकरिता त्यांना 20 ते 25 हजार रुपये पर्यंत खर्च येतो. याप्रमाणे ते वर्षातून खर्च वजा जाता पाच ते सहा लाख रुपयांचे उत्पन्न या रेशीम शेतीतून मिळवत आहेत.

अभिजीत शिंदे यांची रेशीम शेतीतील प्रगती पाहता त्यांच्याच गावातील 14 ते 15 शेतकऱ्यांनी देखील आता तुतीची लागवड करून रेशीम शेती करण्याला सुरुवात केलेली असून त्या माध्यमातून रेशीम चे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली आहे.

 अभिजीत शिंदे यांच्या दृष्टिकोनातून रेशीम शेती का आहे फायद्याची?

अभिजीत शिंदे यांच्या मते जास्त पाऊस झाला किंवा पाऊस कमी जरी पडला तरी तूतीचे नुकसान होत नाही. तसेच इतर पिकांप्रमाणे खत आणि फवारणी देखील परत परत करावी लागत नसल्यामुळे खर्च कमी असतो. तसेच बाजारभाव इतर पिकांच्या मानाने चांगला मिळत असल्याने इतर पिकांच्या तुलनेमध्ये रेशीम शेती फायद्याची असल्याचे ते म्हणतात.