राज्यात पवार विरुद्ध पवार ! आ. रोहित पवारांचा थेट अजित दादांवर निशाणा साधत मोठा गौप्यस्फोट

Ahilyanagarlive24 office
Published:

महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आगामी लोकसभा, विधानसभेच्या अनुशंघाने मोठी तयारी सर्वच पक्षांची सुरु आहे. भाजपने आधी शिवसेना व आता राष्ट्रवादी फोडून त्यांची राज्यातील ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला. आता मागील दोन दिवसांपासून राज्यात पवार विरुद्ध पवार वातावरण दिसत आहे.

अजित पवारांनी थेट शरद पवार व रोहित पवार यांच्यावरच टीका केली. पदयात्रा, संघर्षयात्रा आदींवरून त्यांनी रोहित पवारांनाही टार्गेट केलं होत. आता आ. रोहित पवार यांनी याला प्रतिउत्तर देत घणाघात केला आहे.

 काय म्हणाले रोहित पवार :- राज्यात पवार विरुद्ध पवार करण्याची भाजपची इच्छा आहे. केंद्र सरकारमधील नेते त्यांची पूर्ण ताकद आम्हाला अडचणीत आणण्यासाठी लावतील. संघर्ष यात्रा, पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही लोकांमध्ये जात असतो त्यातून लोकांना महत्व देण्याचा विचार करतो.

परंतु लोकांमध्ये जाणं त्यांना योग्य वाटत नसेल तर तो त्यांचा विषय राहिला पण आम्ही लोकांमध्येच असतो. आगामी काळात आम्ही लोकांच्या हिंमतीवर तर जे सत्तेत आहेत ते पैशांच्या ताकदीवर लढणार आहेत. निवडून आलो तर लोकांमुळे, निवडून नाही आलो तरी लोकांमुळेच पण आम्ही आमचा विचार सोडणार नाही असे ते म्हणालेत.

अजित दादांविषयी काय म्हणाले? :-  शरद पवार यांनी स्वतःच्या हिंमतीवर पक्ष उभा केला असून त्यान्हा लोकसंपर्क जनतेला ठाऊकच आहे. वयाच्या ३८ व्या वर्षी त्यांनी बंड केलं असं म्हटलं जातंय पण त्याला बंड म्हणता येणार नाही कारण त्यावेळी अनेक लोकांनी एकत्र येऊन तो निर्णय घेतला होता असे ते म्हणाले.

तसेच आता सत्तेत असणारे नेते अनेक वर्ष शरद पवारांमुळे सत्तेत होते व आता आपल्यावर कारवाई होईल म्हणून ते तिकडे गेल्याचे आ. रोहित पवार म्हणाले. भाजपबरोबर तुम्ही गेलात तर तुम्हाला भाजपची स्क्रिप्ट ही वाचावीच लागते हे सर्वाना माहित आहेच व आता अजितदादांबरोबरही तेच होत असल्याचा निशाणा त्यांनी सांधला.

पण भाजपला कुठेही पवार हे परवडणारे नाहीत असेही ते म्हणाले. टप्प्याटप्प्याने अजित पवारांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न मागील काही महिन्यात झाला असून आता पवार विरुद्ध पवार करण्याची भाजपची इच्छा असल्याचा घणाघात त्यांनी केलाय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe