Top 3 Electric Car News : येत्या सहा दिवसात हे वर्ष संपणार आहे आणि नवीन वर्ष अर्थातच 2024 ची सुरुवात होणार आहे. यंदाचे हे वर्ष मात्र कार प्रेमींसाठी विशेष आनंदाचे ठरले आहे. कारण की यंदा अनेक दिग्गज कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक कार बाजारात लॉन्च केल्या आहेत.
दरम्यान जर तुम्हीही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याच्या प्लॅनमध्ये असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास ठरणार आहे. कारण की आज आपण देशातील टॉप 3 इलेक्ट्रिक कारची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण देशात सर्वात जास्त विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्यांची थोडक्यात माहिती पाहणार आहोत. विशेष म्हणजे आज आपण ज्या इलेक्ट्रिक गाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत त्यांची किंमत ही खूपच कमी आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया देशातील टॉप 3 इलेक्ट्रिक कार आणि यांच्या विशेषता अगदी थोडक्यात.
MG Comet EV : MG Motors ही देशातील एक नामांकित कार मेकर कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक कार बाजारात लोकप्रिय आहेत. ग्राहकांमध्ये या कंपनीच्या गाडीची विशेष क्रेज पाहायला मिळते. कंपनीची MG Comet EV ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार म्हणून ओळखली जात आहे.
ही गाडी या चालू वर्षात लाँच झाली आहे. या कारची किंमत 7.98 लाख रुपये (एक्स-शोरूम) एवढी ठेवण्यात आली आहे. या कारने भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारचा किताब पटकावला आहे. एमजीचे ही ईव्ही कार एका पूर्ण चार्जवर 230 किलोमीटरची रेंज देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. निश्चितच जर तुम्हाला कमी किमतीत इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल तर एमजी कंपनीची ही गाडी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
Tata Nexon EV : टाटा ही देशातील एक दिग्गज ऑटोमोबाईल कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. टाटा कंपनीवर ग्राहकांचा मोठा विश्वास आहे. दरम्यान या चालू वर्षात Tata Motors ने त्यांच्या सर्वात लोकप्रिय कार इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये लॉन्च केली आहे.
कंपनीने Tata Nexon EV ही कार यंदा लॉन्च केली आहे. विशेष म्हणजे लॉन्च झाल्यानंतर या गाडीने एक नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. ही गाडी भारतात सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार आहे. Tata Nexon EV ची (एक्स-शोरूम) किंमत 14.74 लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. ही कार पूर्ण चार्ज केल्यावर ४६५ किलोमीटरची रेंज देते असा दावा कंपनीने केला आहे. जर तुम्ही अधिक रेंज देणारी इलेक्ट्रिक कार खरेदी करू इच्छित असाल तर ही गाडी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
Citroen eC3 : सिट्रोएन कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी नुकतीच एक इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. ही इलेक्ट्रिक कार ग्राहकांना झपाट्याने आकर्षित करत आहे. Citroen eC3 ही कंपनीची एक हॉट फेवरेट इलेक्ट्रिक कार आहे. या कारची (एक्स-शोरूम) किंमत 11.5 लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.
Citroen ची ही कार फुल चार्ज झाल्यावर 320 किलोमीटरची रेंज देत असल्याचा दावा कंपनीकडून केला जात आहे. जर तुम्ही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याच्या प्लॅनमध्ये असाल आणि तुमचा बजेट 12 लाखाच्या आसपास असेल तर तुमच्यासाठी ही कार खरेदी करणे निश्चितच फायदेशीर ठरणार आहे.