33 Kmpl चे मायलेज देणाऱ्या ‘या’ कारची किंमत आहे फक्त 4.50 लाख, डिस्काउंट ऑफरही मिळणार, वाचा सविस्तर

Ahmednagarlive24 office
Updated:

Cheapest Car In India : भारतात असे अनेक लोक आहेत ज्यांना किफायतशीर दरात कार खरेदी करायची असते. हेच कारण आहे की देशातील अनेक नामांकित कंपन्या बजेट फ्रेंडली कार बनवतात.

दरम्यान आज आपण अशा दोन बजेट फ्रेंडली कारची माहिती जाणून घेणार आहोत ज्या कार खिशाला परवडणाऱ्या तर आहेच शिवाय या कारचे मायलेज देखील खूपच दमदार आहे. खरे तर भारतीय कार बाजारात अनेक कंपन्यांच्या बजेट कार उपलब्ध आहेत.

यापैकी काही कारची किंमत मात्र पाच लाख रुपये एवढी आहे. विशेष म्हणजे या अशा बजेट कारवर एअर एंड डिस्काउंट ऑफर देखील मिळत आहे.

Maruti Alto K10 : ही देशातील सर्वाधिक किफायतशीर कार आहे. या कारची एक्स शोरूम किंमत फक्त 4.59 लाख रुपये एवढी आहे. त्यामुळे जर तुम्हीही बजेट कार खरेदी करू इच्छित असाल तर या कारचा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट राहू शकतो.

विशेष म्हणजे चालू वर्षात ही गाडी खरेदी केली तर एअर अँड ऑफरचा देखील लाभ मिळणार आहे. परिणामी या गाडीची किंमत आणखी कमी होईल. कंपनीने ही CNG गाडी तब्बल 33 किलोमीटर प्रति किलों पर्यंतचे मायलेज देत असल्याचा दावा केला आहे.

या कारमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. ही कार एकूण सात प्रकारांमध्ये येते. मारुतीच्या या कारमध्ये शक्तिशाली 1.0 लीटर तीन सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन ६६ बीएचपी पॉवर आणि ८९ एनएम पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. तथापि ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल अशा दोन्ही प्रकारांची किंमत ही वेगवेगळी राहणार आहे. मारुतीची ही सर्वात लोकप्रिय कार आहे. बाजारात या कारची मोठी लोकप्रियता आहे. मध्यमवर्गीय लोक ही कार खरेदी करण्याला विशेष पसंती दाखवतात.

रेनॉल्ट क्विड : ही देखील एक बजेट फ्रेंडली कार आहे. या गाडीचे भन्नाट फीचर्स ग्राहकांना विशेष आकर्षित करत आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार या बजेट कारमध्ये एलईडी डीआरएल आणि स्मार्ट लूक फ्रंट ग्रिल आहे, जे कारला बोल्ड लूक देत आहेत.

या कारमध्ये 1.0 लीटर पेट्रोल इंजिन आहे. यात 0.8 लीटर इंजिनचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. हे इंजिन तीन सिलिंडरसह येते, जे शहरात उच्च कार्यक्षमता प्रदान करते. या दमदार इंजिनमुळे शहरात प्रवास करताना वाहनचालकांना कोणतीच अडचण भासत नाही.

कार रस्त्यावर जास्तीत जास्त 67 bhp पॉवर आणि 91Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या गाडीची किंमत खिशाला परवडणारी सुद्धा आहे. Renault Kwid कारची बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत फक्त 5.38 लाख रुपय एवढी ठेवण्यात आली आहे.

या कारमध्ये एअरबॅग, हिल स्टार्ट असिस्ट आणि मिरर माउंटेड इंडिकेटर यांसारखे हाय रेटेड फीचर्स देखील उपलब्ध आहेत. या गाडीची किंमत ही मुळातच कमी आहे शिवाय इयर एंड डिस्काउंटचा देखील ऑफर मिळणार आहे. तथापि गाडी खरेदी करण्यापूर्वी तज्ञ लोकांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe