आपल्याकडे ९० टक्के मते आहेत. निवडणूक बिनविरोध होईल अशा भ्रमात कोणीही राहु नये. समोरचा पॅनल होणार आहे. निवडणूक ही निवडणूक असते. निवडणूक करायची आहे.
चांगल्या पद्धतीने त्याला सामोरे जावे लागेल. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वांनी चांगले काम केले यश मिळाले, तसेच आता खरेदीविक्री संघाच्या निवडणुकीत करावयाचे आहे. कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे असे आवाहन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले.
येथील व्हाईट हाऊस येथे खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीच्या पुर्व तयारीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अर्जुनराव शिरसाट, नारायण धस, काशिनाथ पाटील लवांडे, संजय बडे, अभय आव्हाड, माणिकराव खेडकर, सुभाष बर्डे, उत्तमराव गर्जे, गजानन कोष्टी, डॉ. मृत्युंजय गजें, मंगल कोकाटे, सिंधुताई साठे, काशीबाई गोल्हार,
अमोल गर्जे, एकनाथ आटकर, अंकुश चितळे, अंकुश कासुळे, कैलास देवढे, अजित देवढे, अजय रक्ताटे, हिंदकुमार औटी, नारायण पालवे, रशीद तांबोळी, प्रदीप पाटील, बंडु पठाडे, नवनाथ भवार, सुरेश चव्हाण, रावसाहेब वांदेकर, मुरलीधर पालवे, आण्णासाहेब होंडे, मच्छिद्र सावंत, दत्तात्रय मराठे, शरद पडोळे, विजय ढोले आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ. राजळे म्हणाल्या, नऊ महीन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार अतिशय चांगला केला. बाजार समितीने स्वतःच्या ठेवी निर्माण केल्या आहेत. २०२४ या वर्षात खरेदीविक्री संघाची निवडणुक चांगली कारवयाची आहे.
कार्यकर्त्यांनी रुसवे फुगवे बाजुला ठेवा. कोणीही नाराज होवु नका. पाथर्डीच्या वैभवात भर घालेल असा कारभार करण्यासाठी नवे चांगले संचालक मंडळ द्यावयाचे आहे. स्वर्गीय दादापाटील राजळे, बबनरावजी ढाकणे, बाबुजी आव्हाड, रामभाऊ अकोलकर यांनी सहकाराच्या माध्यमातुन चांगले काम करण्याचा वारसा दिलेला आहे.
सगळीकडे विरोधक नक्कीच असतात मात्र चांगल्या कामासाठी एकत्रीत येण, काही चुकत असेल तर समजावुन सागंणे अशा गोष्टी झाल्या पाहीजेत. निवडणुक करण्यासाठी तुम्ही संघटीतपणे तयार रहावे. लोकसभेची निवडणुकीची तयारी सुरु आहे. व हे वर्ष निवडणुकीचे आहे. संघटना महत्वाची असते.
नमो चषक खेळाच्या स्पर्धा आयोजित करावयाच्या आहेत. खासदार डॉ. सुजय विखे, माजीमंत्री शिवाजीराव कर्डीले व मी आणि आपले ज्येष्ठ कार्यकर्ते मिळुन उमेदवारीचा निर्णय करु.
कोणीही नाराज होवु नयेत. जी जबाबदारी कार्यकर्त्यांवर देवु ती पार पाडावी. खरेदी विक्री संघाची इमारत उभी राहत आहे. निवडणुकीत व्यक्तीगत टिका करावयाची नाही.
आमदार राजळे देतील त्या संचालक मंडळाला निवडुन आणण्याचे काम भाजपाचे कार्यकर्ते करतील. त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य राहील, असे बहुतेक वक्त्यांनी सांगितले. खासदार सुजय विखे, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले, व आमदार मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणुक होईल.
ज्याला आमदार राजळे सांगतील त्यांनीच उमेदवारी अर्ज दाखल करावेत. जास्त अर्ज भरल्यास शेवटच्या क्षणाला खुप मोठी नाराजी व दमछाक होते, त्यामुळे निवडक अर्ज दाखल करावेत अशा सुचना कार्यकर्त्यांनीच केल्या आहेत.