Credit Card Scam : क्रेडिट कार्डचे रिवार्ड पॉईंट जमा करण्याच्या नावाखाली महिलेची लाखांची फसवणूक

Ahmednagarlive24 office
Published:
Credit Card Scam

Credit Card Scam : क्रेडिट कार्डचे रिवार्ड पॉईंट बँक खात्यावर जमा करण्यासाठी आलेल्या बनावट कॉलला प्रतिसाद दिल्यामुळे एका महिलेची ३ लाख २९ हजार ८०० रुपयांची फसवणूक झाली. याप्रकरणी नगर-कल्याण रस्त्यावरील ड्रिम सिटी परिसरातील महिलेने बुधवारी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

महिलेचे ऍक्सिस बँकेच्या चितळे रस्त्यावरील शाखेत खाते आहे. त्या बँकेचे क्रेडिट कार्डसुद्धा वापरतात. त्यांना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास एका अनोळखी मोबाईल नंबरवरून फोन आला.

त्यानेअॅक्सिस बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. तुमचे क्रेडिट कार्डचे रिवार्ड पॉईंट तुमच्या खात्यावर जमा होतील, असे सांगून मोबाईलवर पाठविलेला ओटीपी मागितला. तसेच व्हॉट्सअॅपला लिंक पाठवून त्यावरून बँकेचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगून फोन बंद केला. पुन्हा त्याचा संपर्क झाला नाही.

काही वेळाने फिर्यादीच्या मोबाईलवर बँक खात्यातील पैसे डेबिट झाल्याचे मेसेज आले. एकुण ३ लाख २९ हजार ८०० काढून घेतले. त्यानंतर फिर्यादीने पतीसह बँकेत धाव घेतली.

तेथे चौकशी केली असता असा कोणताही फोन केला नसल्याची माहिती बँकेने दिली. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांत फिर्याद दिली. याप्रकरणी तोफखाना पोलिस अधिक तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe