Rahuri News : गुहा येथील ‘त्या’ जागेवर मूर्ती बसवली

Ahmednagarlive24 office
Published:
Rahuri News

Rahuri News : राहुरी तालुक्यातील गुहा गावात एका धार्मिक स्थळावरून वाद सुरू असताना गावकऱ्यांसह कानिफनाथ भक्तांनी वेद मंत्राचा गजर व भजन करत कानिफनाथ महाराजांची मूर्ती बसवली.

भक्तांनी अचानक मूर्ती प्राणप्रतिष्ठापना केल्याने पोलीस प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. गावामधे मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला होता.

गुहा येथे गेल्या अनेक दिवसांपासून कानिफनाथ धार्मिक स्थळांवरून वाद सुरू आहे. या ठिकाणी काही दिवसांपूर्वी भजन सुरू असताना भक्तांना मारहाण करण्यात आली होती. धार्मिक कार्यक्रमाला विरोध झाल्याने राहुरी तहसील कार्यालयावर हिंदु जनअक्रोश मोर्चा निघाला होता.

घटनेबाबत परस्परविरोधी गुन्हे दाखल झाला होता. काल पहाटे या ठिकाणी भक्तांनी कानिफनाथ महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. ही माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे,

पोलीस निरीक्षक संजय सोनवणे, प्रांताधिकारी किरण सावंत, नायब तहसीलदार संध्या दळवी यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला. त्यानंतर अहमदनगर येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल खैरे यांनी याठिकाणी भेट देऊन कानिफनाथ भक्त व गावकऱ्यांशी चर्चा केली.

दरम्यान माजी आमदर शिवाजीराव कर्डिले यांनी कानिफनाथ मूर्तीचे दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते यावेळी आरतीही झाली. त्यांच्या समवेत भाजप जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, तालुकाध्यक्ष सुरेश ब्रानकर, भैय्यासाहेब शेळके, के. मा. कोळसे, उमेश शेळके, सचिन मेहत्रे, सुजय काळे, विकास कोबरणे यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe