Ahmednagar News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या आदेशाने, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमित भांगरे यांची निवड केली आहे.
अकोले विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच शरद पवारांच्या पाठिशी उभा राहिलेला आहे. पुरोगामी विचारांचा प्रतिनिधी या मतदारसंघात निवडून आणण्यासाठी व शरद पवार यांच्या मागे उभे राहण्यासाठी प्रयत्न करू, असे भांगरे यांनी सांगितले.
अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात संगमनेर – अकोले विधानसभेचे पहिले आमदार हे शेंडी येथील स्व.गोपाळराव भांगरे होते. पुढे अकोले विधानसभेचे आमदार स्व. यशवंतराव भांगरे होते.
त्यानंतर अहमदनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन म्हणून स्व. अशोकराव भांगरे यांनी काम केले. तर सुनिताताई अशोकराव भांगरे यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून दोन पंचवार्षिक काम केले.
हाच भांगरे कुटुंबाचा राजकीय वारसा अमित भांगरे चालवत आहेत. शरद पवार यांनी नवीन जबाबदारी देत त्यांना सक्रिय राजकारणात संधी दिली आहे.