अहमदनगर ब्रेकिंग : राजकीय पदाधिकाऱ्यांनी केली मतदार यादीची होळी

Published on -

Ahmednagar Breaking : पाथर्डी तालुका शेतीमाल खरेदी विक्री संघाची निवडणूक आमदार मोनिका राजळे यांनी प्रशासनाला दडपशाहीतून सभासदांना बेसावद ठेवून लावली. असा आरोप करत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सहायक निबंधक कार्यालयासमोर मतदार यादीची होळी करून जाहीर निषेध नोंदविला.

तालुका खरेदी विक्री संघाचे निवडणूक कार्यक्रम लागला असून, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. मात्र या निवडणुकी संदर्भात संस्थेचे सभासद अथवा राजकीय पक्षांना कोणतीही कल्पना येऊ न देणे, अगोदरच जिल्हा उपनिबंधक व सहाय्यक निबंधक यांना हाताशी धरून व सत्तेचा दुरुपयोग करून, संबंधित निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला.

याच्या निषेधार्थ काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी दुपारी येथील सहाय्यक निबंधक निवडणूक कार्यालयासमोर निवेदन देत मतदार यादीची होळी केली. यावेळी बोलताना संस्थेचे माजी संचालक सिताराम बोरुडे म्हणाले २०१६ मधे संस्थेची सभासद संख्या २३०० होती.

मात्र आमदार राजळे यांनी संस्था व तालुका सहायक निबंधक यांना हाताशी धरून जवळपास एक हजार सभासद कमी केले. आजचे सभासद म्हणून आहेत, त्यापैकी सुमारे एक हजार सभासद आपल्या मर्जीतले ठेवले असून, विरोधकांना सभासद नोंदणी संदर्भात कोणती सूचना देण्यात आलेली नाही.

संस्थेचा कारभार हा मनमर्जीपणाने संचालक मंडळ हाकत आहेत आणि या संपूर्ण गैर कारभाराला आमदार राजळे यांची पाठबळ आहे. नव्याने शेअर्स करून घेण्यासंदर्भात गुपचूपपणे जाहिरात देण्यात आली. आणि या जाहिरातीची कोणालाही कल्पना येऊ नये म्हणून सर्व सभासदांना बेसावध ठेवून आपल्या मर्जीतील तीन चार गावातीलच सभासदांना कायमस्वरूपी करण्यात आले.

सहकार विभागाने या संपूर्ण गैरकारभाराची दखल घ्यावी आणि सर्व सभासदांना न्याय देण्यात यावा. तोपर्यंत लागलेली निवडणूक स्थगित करून सर्व सभासदांना पूर्वकल्पना देऊन या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करावी. असे आमचे मागणे असून याचा गांभीर्याने विचार करावा, अन्यथा सहकार विभाग व खरेदी विक्री संघाविरोधात तीव्र आंदोलन सुरू असे ते शेवटी म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नाशिर शेख, माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे, शहराध्यक्ष योगेश रासने, देवा पवार, सचिन नागपुरे, बाळासाहेब घुले, दिगंबर गाडे, सागर विधाटे, हुमाऊन आतार, अक्रम आतार, राजेंद्र बोरुडे, चांव मनियार, विनय बोरुडे आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News