Ahmednagar News : अहमदनगर महापालिकेवर प्रशासकराज ! प्रशासक म्हणून ‘यांची’ नियुक्ती

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

महापालिकेची मुदत ३१ डिसेंबरला संपेल असे सर्वचलोक गृहीत धरून होते. त्यानंतर निवडणूक तर शक्य नाहीत म्हणजेच प्रशासक राज येईल हे देखील गृहीत होते. यात प्रशासक म्हणून बहुतेक जिल्हाधिकारी असतील अशी शक्यता होती. परंतु आता सर्वच शक्यता फोल ठरल्या आहेत. याचे कारण असे, महापालिका लोकनियुक्त मंडळाची मुदत ३१ नव्हे तर २७ डिसेंबरला मध्यरात्रीच संपुष्टात आली.

आता महापालिकेच्या प्रशासकपदी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची नियुक्ती झाली आहे. दरम्यान नगरविकास खात्याने २८ डिसेंबरला पत्र काढून प्रशासक म्हणून आयुक्त यांच्याकडे पदभार सोपवावा, असे म्हटले होते. परंतु महापालिकेला हे पत्र गुरूवारी उशीरा प्राप्त झाले. त्यानंतर आयुक्त डॉ. जावळे यांनी प्रशासकपदाचा कार्यभार आजपासून अर्थात शुक्रवारपासून स्विकारला आहे.

जिल्हाधिकारी की आयुक्त ?

नगरसेवकांचा कार्यकाळ २७ डिसेंबरला मध्यरात्री संपल्याने गुरूवारी व शुक्रवारी होणाऱ्या अनुक्रमे स्थायी समिती सभा आणि महासभा रद्द करण्यात आल्या. या सभा रद्द झाल्याने अनेकांचा हिरमोडही झाला. या सभा रद्द झाल्या मात्र महापालिकेवर प्रशासक कोण, असा प्रश्न सर्वांचं पडला होता.

जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी मध्यंतरी एका कार्यक्रमात ‘मी प्रशासक झालो तर…’ असे वक्तव्य केले असल्याने बहुतेक तेच प्रशासक पदाचा कार्यभार घेतील असे वाटत होते. परंतु आता नगरविकास खात्याने २८ डिसेंबरला पत्र काढून प्रशासक म्हणून आयुक्त यांच्याकडे पदभार सोपवावा असे सांगितलेय.

आयुक्त जावळे यांनी घेतली ‘झाडाझडती’

प्रशासक पदाची सूत्रे हाती येताच आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या सर्व विभागांना भेटी दिल्या आहेत. विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांना आपापली प्रशासकीय कर्तव्य तत्परतेने पार पाडण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले.

डॉ. जावळे यांनी सर्व युवा प्रमुखांना आपापला विभाग व मनपा मुख्य इमारत स्वच्छ करण्याचे निर्देश दिले असून गैरहजर कर्मचाऱ्यांची माहिती मागवून घेतली आहे. त्याचप्रमाणे विभागात असलेल्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांची देखील माहिती संकलित करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. त्यामुळे आता प्रशासक पदी आल्यानंतर डॉ.पंकज जावळे कशा पद्धतीने कारभार करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe