Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धनकडून दूध काढणी यंत्र व गोठ्यासाठी अनुदानाचे वाटप ! पहा तुमचे नाव यात आहे का?

Published on -

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील पशुसंवर्धन करणाऱ्या व दूध उत्पादक शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ शासनाकडून दिला जातो. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग नेहमीच विविध योजना राबवत असतो. आता पशुसंवर्धनकडून जिल्ह्यातील १३३ पशुपालकांना दूध काढणी यंत्र तर ७५ लाभार्थ्यांना मुक्त संचार गोठ्यासाठी अनुदान देण्यात आले.

गुरुवारी २८ डिसेंबर रोजी पशुसंवर्धन विभाग व दुग्धशाळा समितीची सभा पार पडली. यात जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या पशुपालकांना दूध काढणी यंत्राचा पुरवठा करणे आणि मुक्तसंचार गोठा तयार करण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान देणे या दोन योजनांतर्गत लाभ देण्यात आला.

कशी झाली निवड ?

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पशुसंवर्धन व दुग्धशाळा सल्लागार समितीचे अध्यक्ष संभाजी लांगोरे यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच पशुधन विकास अधिकारी समिती सदस्य यांच्या उपस्थितीत लॉटरी पद्धतीने लाभाथ्यर्थ्यांची निवड केली. भाग्यवान लाभार्थ्यांच्या निवडीच्या चिठ्ठया हिमांगी सुनील सूर्यवंशी या बालिकेच्या हस्ते काढण्यात आल्या.

किती मिळणार लाभ?

यामध्ये या योजनेनुसार आता दूध काढणी यंत्रासाठी ६० टक्के किंवा जास्तीत जास्त १५ हजार रुपये अनुदान देण्यात येईल. मुक्त संचार गोठ्यासाठी ५० टक्के किंवा जास्तीत जास्त २० हजार रुपये अनुदान देण्यात येईल. निवड झालेल्या लाभार्थ्यांनी योजनेच्या निकषाप्रमाणे दूध काढणी यंत्र खरेदी केल्यानंतर तसेच निकषानुसार मुक्तसंचार गोठा तयार केल्यानंतर अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

लाभार्थ्यांची यादी पुढीलप्रमाणे 

दूध काढणी यंत्र – नगर-१२, राहुरी-१२, श्रीरामपूर-६, राहाता-६, कोपरगाव-६, संगमनेर-१५, अकोले-८, पारनेर- ११, श्रीगोंदा-११, कर्जत-१०, जामखेड-६, पाथर्डी-९, शेवगाव-८, नेवासा-१३ अशा एकूण १३३- मुक्तसंचार गोठा – नगर-७, राहुरी-६, श्रीरामपूर ४, राहाता-४, कोपरगाव-३, संगमनेर-८, अकोले-५, पारनेर-४, श्रीगोंदा-६, कर्जत-७, जामखेड-३, पाथर्डी-५, शेवगाव-४, नेवासा-७ अशा एकूण ७५

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!