Sukanya Samriddhi Yojana : मोदी सरकारचे न्यू इयर गिफ्ट ! सुकन्या समृद्धी योजनेसह लहान बचत योजनांवर मिळणार आता इतके व्याज, इथे पहा नवीन दर

Ahmednagarlive24 office
Published:

Sukanya Samriddhi Yojana : केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक नवीन योजना सादर केल्या जात आहेत. तसेच सध्या अनेक लहान बचत योजना मोदी सरकारने देशात सादर केल्या आहेत. या योजनेचा फायदा देशातील नागरिकांना होत आहे.

केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांना मोठे गिफ्ट दिले आहे. सुकन्या समृद्धी योजनेसह लहान बचत योजनांच्या व्याजदरात केंद्र सरकारकडून वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारच्या अशा बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी फायदा होणार आहे.

सुकन्या समृद्धी बचत योजनेचा नवा दर

सुखानी समृद्धी योजनेमध्ये बचत करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण सरकारकडून 1 जानेवारीपासून आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीसाठी सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदरात 0.20% वाढ करण्यात आली आहे.

आता या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 8% नाही तर 8.20% वार्षिक व्याज दिले जाणार आहे. 22 जानेवारी 2015 रोजी मोदी सरकारकडून सुकन्या समृद्धी योजना सुरु करण्यात आली आहे. तुम्हीही तुमच्या मुलीच्या नावाने या बचत योजनेसाठी खाते उघडू शकता.

मुलीच्या 10 वर्षापर्यंतच तुम्ही हे खाते काढू शकता

तुम्हालाही सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खाते उघडायचे असेल तर तुम्ही 10 वर्षाच्या आतच खाते उघडू शकता. या योजनेसाठी कुटुंबातील फक्त दोन मुलींसाठी हे खाते उघडता येऊ शकते. 21 वर्षांची झाल्यानंतर किंवा मुलीचे लग्न झाल्यानंतर खाते परिपक्व होईल आणि तुम्हाला व्याजासह संपूर्ण पैसे मिळतील.

5 वर्षानंतरही खाते बंद करता येते

तुम्ही सुकन्या सुमृद्धी योजनेमध्ये खाते उघडले असल्यास आणि तुम्हाला ते कालावधी आधीच बंद करायचे असेल तर तुम्ही पाच वर्षानंतरही ते बंद करू शकता. मात्र हे खाते तुम्ही धोकादायक आजार झाला असेल तरच बंद करू शकता.

यावर तुम्हाला व्याज दिले जाईल. चालू आर्थिक वर्षात तुम्ही फक्त 1.5 लाख रुपये जमा करू शकतात. तुम्ही या योजनेत गुंतवणूक करून कर सूट देखील मिळवू शकता. सरकारच्या या योजनेत किमान 250 प्रति वर्ष आणि कमाल 1,50,000 रुपयांची गुंतवणूक करू शकता.

जानेवारी-मार्च 2024 मध्ये कोणत्या योजनेवर किती व्याज मिळणार?

1. पोस्ट ऑफिस बचत खात्यावर 4 टक्के
2. 2 वर्षांच्या ठेवीचा व्याज दर 7.0 टक्के
3. एक वर्षाच्या ठेवीवरील व्याज दर 6.9 टक्के
4. ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSSY) व्याज 8.2 टक्के
5. 5 वर्षांच्या मुदत ठेवीवर 7.5 टक्के व्याज
6. 5 वर्षांच्या RD योजनेवर 6.7 टक्के व्याज
7. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) व्याज 7.7 टक्के
8. किसान विकास पत्रावरील व्याज 7.5 टक्के 9. मासिक उत्पन्न खात्यावर 7.4 टक्के व्याज
10. सुकन्या समृद्धी खाते (SSY) व्याज 8.2 टक्के
11. 3 वर्षांच्या मुदत ठेवीचा व्याज दर 7.1 टक्के
12.सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) व्याज 7.1 टक्के

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe