अहमदनगर – पुणे रस्त्यावर वाहतूक बदल !

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : भीमा कोरेगाव येथे सोमवारी (दि. १) विजयस्तंभ अभिवादनाच्या होणाऱ्या कार्यक्रमामुळे पुणे-नगर महामार्गावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी रविवारी (३१ डिसेंबर) दुपारी दोन वाजल्यापासून वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.

अभिवादन कार्यक्रमास राज्यभरातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याने वाहतूकबदल करण्यात येणार आहे.

पुण्याकडून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी खराडी बाह्यवळण मार्गावरून वळून मुंढवा, मगरपट्टा चौक, पुणे-सोलापूर रस्ता, केडगाव चौफुला, न्हावरा, शिरूरमार्गे नगर रस्त्याकडे जावे.

सोलापूर रस्त्याने आळंदी, चाकणकडे जाणाऱ्या वाहनांनी हडपसर, मगरपट्टा चौक, खराडी बाह्यवळण मार्गावरून विश्रांतवाडीकडे जावे. तेथून आळंदी आणि चाकणकडे जावे. मुंबईकडून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटामार्गे नगरकडे जावे. मुंबईहून नगरकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूरमार्गे नगरकडे जावे.

कोल्हापूर, सांगली, सातारा, कात्रजमार्गे मंतरवाडी फाटा, मगरपट्टा चौक येथून नगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी हडपसर येथून केडगाव चौफुलामार्गे शिरूरकडे जावे. इंद्रायणी नदीवरील आळंदी-तुळापूर पूल जड वाहतुकीस बंद करण्यात आल्याने या पुलावरून केवळ अनुनायांच्या हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. विश्रांतवाडी, लोहगावमार्गे वाघोलीकडे जाणारी जड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

बीआरटी मार्गाचा वापर करण्यास मुभा…

नगर रस्त्यावरील कोंडी टाळण्यासाठी विमाननगर चौक ते खराडी जकात नाकादरम्यान बीआरटी मार्ग वापरण्याची मुभा वाहतूक पोलिसांनी दिली आहे. येत्या रविवारी (३१ डिसेंबर) आणि सोमवारी (१ जानेवारी) बीआरटी मार्गावरील दोन्ही मार्गिका अनुयायांच्या वाहनांसाठी खुल्या करून देण्यात येणार आहेत, असे वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe