Marathi News : आपला देश हा सर्वधर्म सहिष्णू आहे. सर्वच धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने नांदत असतात. यामध्ये धर्मांतर करण्याचेही अनेक प्रकार समोर येत असतात. छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यात धर्मांतर करण्याचे प्रकार या वर्षात जास्त वाढले.
धर्म बदललेल्या नागरिकांनी सरकारी गॅझेटमध्ये प्रकाशित केलेल्या जाहिरातींनुसार जर आपण आकडेवारी पाहली तर २०२२ मध्ये मराठवाड्यात ४८ व यावर्षी २०२३ मध्ये ५९ नागरिकांनी त्यांचा धर्म बदलला असल्याची माहिती समोर आली आहे.

मुस्लिम धर्म मुलींपेक्षा पुरुषांनी जास्त प्रमाणात स्वीकारला असल्याची माहिती समोर आली आहे. यात काही लोकांनी धर्म, विचार आवडले म्हणून तर काही लोकांनी आपल्या प्रेमासाठी मैत्रीसाठी धर्म बदलला असल्याची माहिती समजते.
– याची आकडेवारी पाहता बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे समजते. मागील वर्षी मराठवाड्यात १५ पुरुषांनी तर ४ महिलांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. यंदा हिंदू धर्मातून बौद्ध होणाऱ्यांचे प्रमाण ३४ असून त्यात ३० पुरुष, ४ महिला असल्याची माहिती समजली आहे.
प्रेमसंबंध किंवा विवाह यामुळे हिंदू मुली मुस्लिम होत असल्याची सध्यातरी सर्वत्र धारणा असली तरी मुस्लिम होणाऱ्या पुरुषांचीही लक्षणीय संख्या असल्याची माहिती आकडेवारीवरून समोर आली. २०२२ मध्ये ५ हिंदू पुरुषांनी मुस्लिम धर्म स्वीकारला होता यंदा ९ हिंदू पुरुषांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असल्याची माहिती आकडेवारीवरून समजते.
धर्मपरिवर्तन का?
ती हिंदू आणि तो मुस्लिम असून दोघांचे प्रेम होते व लग्न करण्यापूर्वी तिने धर्म बदलला असल्याची माहिती एका केसमध्ये समोर आली. तिच्यावर याबाबत कोणतेही बंधन नव्हते की दबावही नसून मला इस्लाम पसंत आहे
म्हणून मी स्वीकारला असे त्या केसमधील महिलेने सांगितले. तर एका केसमध्ये एका पुरुषाने सांगितले की, मला विचार आवडले, हा धर्म पटला त्यामुळे मी हा धर्म स्वीकारला असून यात मला कुणीही जबरदस्ती केली नाही. अशी विविध कारणे समोर येत आहेत.
२०२३ मध्ये धर्म परिवर्तन करणाऱ्यांची आकडेवारी
हिंदू ते शीख (पुरुष) – ०
मुस्लिम ते हिंदू (स्रिया) – १
हिंदू ते मुस्लिम – ९
हिंदू ते मुस्लिम (स्रिया) – ६
बौद्ध ते मुस्लिम (पुरुष) – १
बौद्ध ते हिंदू (पुरुष) – ०
हिंदू ते बौद्ध (पुरुष) – ३०
हिंदू ते बौद्ध (स्त्रिया) – ४
मुस्लिम ते बौद्ध (पुरुष) – १
बौद्ध ते हिंदू (स्त्रिया) – ०
मुस्लिम ते बौद्ध (स्रिया) – ०
हिंदू ते जैन (पुरुष) – ४
खिश्चन ते मुस्लिम (पुरुष) – ०
खिश्चन ते हिंदू (स्रिया) – १
शीख ते मुस्लिम (स्रिया) – १