अकारी पडीत जमिनीचा प्रश्न येत्या महिना ते दीड महिन्यात मार्गी लागेल !

Ahmednagar News : खंडकरी जमीनी वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये घेण्याचा निर्णय झाला. त्याचप्रमाणे अकारी पडीत जमिनीचा प्रश्न येत्या महिना ते दीड महिन्यात मार्गी लागेल. त्या परत केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

तालुक्यातील शिरसगाव येथे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा मंत्री विखे यांच्या हस्ते नुकताच सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे उपस्थित होते.

याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा सरचिटणीस नितीन दिनकर, ज्येष्ठ कार्यकर्ते इंद्रनाथ थोरात, भाजपाचे विठ्ठलराव राऊत, नानासाहेब पवार, भीमा बागुल, प्रकाश चित्ते, बाबासाहेब चिडे, बाळासाहेब तोरणे, नानासाहेब शिंदे, उपसभापती अभिषेक खंडागळे, शरदराव नवले, मंजुषा ढोकचौळे, सरपंच राणी वाघमारे, उपसरपंच गिरीधर आसने, भाऊसाहेब बांद्रे आदी उपस्थित होते

याप्रसंगी मंत्री विखे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील ९ वर्षात केलेल्या निर्णयातून समाज परिवर्तनाचे काम केले. नवीन कोविडची परीस्थिती निर्माण झाली. मागील काळात सर्वांना मोफत लसीकरण झाले.

देशातील ८० टक्के जनतेला मोफत धान्य मिळत असून त्यास २०२९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आयुष्यमान भारत योजना सुरू झाल्याने दवाखान्यात मोफत उपचार मिळाले. महिलांसाठी ग्रामपंचायतला ५० टक्के व विधानसभा, लोकसभेला ३३ टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला. एसटी बसेसमध्ये महिलांना भाडे सवलत दिली.

शेतकऱ्यांना २१ कोटी २२ लाख रुपये नुकसान भरपाई रक्कम खात्यावर जमा केली, शिर्डी एमआयडीसीसाठी ५०० एकर शेती महामंडळाची जमीन घेतली. जे शिर्डीला उद्योग येतील तेच श्रीरामपूर एमआयडीसीला येतील,

त्यामुळे श्रीरामपूरकराच्या मुलांना रोजगार मिळेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी एक कोटी रुपये दिले आहेत. तीन महिन्यात जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी स्मारक उभे राहतील.

शिरसगाव येथे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशराव मुदगुले व सहकारी यांच्या गटास मतदारांनी निर्विवाद सत्ता मिळवून दिली. तालुक्यात अनेक ग्रामपंचायती आपल्या ताब्यात आल्या आहेत.

ना. विखे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे होतील. त्यांनी केलेली विकासकामे पाहूनच मतदान झाले. या तालुक्याला ना. विखे यांनी १५ कोटींचा निधी दिल्याचे भाजपा तालुकाध्यक्ष दिपक पटारे यांनी सांगितले.