ADCC Bank News : अहमदनगर जिल्हा बँकेने चालू वर्षी पीककर्जात वाढ करावी

Ahmednagarlive24 office
Published:
ADCC Bank News

ADCC Bank News : सन २०२४-२५ सालचे पीक कर्ज विषयक धोरण ठरविताना खरीप – भुसार, पशुपालन, पक्षीपालन व मत्स्यव्यवसाय करीता खेळते भांडवल उपलब्ध करून देताना मागील वर्षापेक्षा वाढीव स्केल द्यावे. अशी मागणी जामखेड तालुक्यातील तज्ञ कमिटी सदस्यांनी नगर येथे झालेल्या सभेमध्ये जिल्हा बँकेकडे केली.

जामखेड तालुक्यातून अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे २०२४-२०२५ सालचे पीक कर्जविषयक धोरण ठरविण्यासाठी संचालक अमोल राळेभात यांनी तीन तज्ञ समिती सदस्यांची नियुक्ती केली होती.

यामध्ये कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर राळेभात, सोसायटी चेअरमन शहाजी पाटील, वंजारवाडी तरडगाव माजी सरपंच वसंत सानप यांचा समावेश केला होता. तज्ञ समिती गठित केल्यानंतर शुक्रवार दि.२९ डिसेंबर रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले,

मुख्यव्यवस्थापक रावसाहेब वर्षे, ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब म्हस्के, संचालक भानुदास मुरकुटे, संचालक सीताराम गायकर, संचालक अमोल राळेभात, संचालक करण ससाणे, संचालक काकासाहेब तापकिर, संचालिका अनुराधाताई नागवडे आदिसह बँकेचे विविध विभागाचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी जामखेड येथील तज्ञ समिती सदस्य सुधीर राळेभात व वसंत सानप यांनी चर्चेत सहभाग घेवून २०२४-२५ सालचे पीक कर्ज विषयक धोरण ठरविताना खरीप- भुसार, पशुपालन, पक्षीपालन व मत्स्यव्यवसाय करिता खेळते भांडवल उपलब्ध करून देताना मागील वर्षापेक्षा वाढीव स्केल द्यावे अशी मागणी केली.

या मागणीला बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, सदरचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी घेवून मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठवण्याची ग्वाही दिली. यानंतर जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व करण ससाणे यांनी जामखेडच्या तज्ञ कमिटी सदस्यांचे कौतुक करून त्यांचा सन्मान केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe