Kia Sonet Facelift : टाटा मोटर्सकडून त्यांच्या नवनवीन कार सादर करून ग्राहकांना लक्झरी फीचर्स असलेल्या कारचा पर्याय उपलब्ध करून दिला जात आहे. टाटा मोटर्सने अलीकडेच त्यांची Nexon फेसलिफ्ट एसयूव्ही कार सादर केली आहे.
टाटा मोटर्सच्या Nexon फेसलिफ्ट एसयूव्ही कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र आता किआ कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्सच्या Nexon फेसलिफ्ट एसयूव्ही कारला टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे.
किआ कार उत्पादक कंपनीकडून डिसेंबर 2023 मध्ये त्यांची Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कार सादर केली आहे. आता जानेवारी 2024 मध्ये किआ मोटर्स त्यांची Sonet फेसलिफ्ट कारच्या किमती जाहीर करणार आहे. कंपनीकडून मागणीला महिन्यातच कारचे बुकिंग देखील सुरु करण्यात आले आहे.
किआची नवीन Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कार टाटा मोटर्सच्या Nexon EV शी स्पर्धा करेल. किआकडून त्यांच्या आगामी Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये जबरदस्त प्रीमियम फीचर्स देण्यात येणार आहेत.
किआ Sonet फेसलिफ्टमध्ये मिळणार ही प्रीमियम वैशिष्ट्ये
किआ Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये नवीन डिझाइन पाहायला मिळू शकते. नवीन Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये 6 एअरबॅग्ज, 10 स्वायत्त फंक्शन्ससह सुसज्ज लेव्हल 1 प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS), 10.25-इंच स्क्रीन आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, हिंग्लिश व्हॉइस कमांडसह इलेक्ट्रिक सनरूफ असे मानक फीचर्स दिले जाऊ शकतात.
तसेच Sonet फेसलिफ्ट कारच्या केबिनमध्ये 10.25 इंच इंस्ट्रुमेंट क्लस्टर, 7 स्पीकर साउंड सिस्टीम, 460 डिग्री कॅमेरा आणि ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर, टायर प्रेशर मॉनिटरिंग, हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल, VSM, ESC अशी अनेक वैशिष्ट्ये कारमध्ये दिली जाणार आहेत.
Sonet फेसलिफ्ट इंजिन
किआ कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये 1.2 लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेल इंजिन असे तीन इंजिन पर्याय कायम ठेवले जाणार आहेत. कारच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.