Sandeep Maheshwari Monthly Income : सध्या सोशल मीडियामध्ये संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा ही दोन नावे विशेष चर्चेत आली आहेत. गेल्या वर्षाचा शेवट हा सोशल मीडियामध्ये या दोघांमध्ये सुरू असलेल्या भांडणानेच झाला आहे.
देशातील प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी यांनी विवेक बिंद्रा यांच्यावर मल्टी लेवल मार्केटिंग चा आरोप लावला आहे. बिंद्रा बडा बिजनेस प्रायव्हेट लिमिटेड चे संस्थापक, प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर आणि youtuber आहेत.
दरम्यान बिंद्रा हे त्यांच्या कंपनीच्या मल्टी लेवल मार्केटिंग करत असल्याचे संदीप माहेश्वरी यांनी म्हटले आहे. यानंतर विवेक बिंद्रा यांच्यावर त्यांच्या धर्मपत्नीला मारहाण करण्याचा देखील आरोप झाला.
त्यामुळे संदीप माहेश्वरी यांनी विवेक बिंद्रा हे खूपच चर्चेत आहेत. यामुळे आज आपण प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी हे एका महिन्यात किती कमाई करतात आणि त्यांचे शिक्षण किती झाले आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
संदीप माहेश्वरी यांचे शिक्षण काय
संदीप माहेश्वरी हे भारतातील एक प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर, युट्युबर आणि यशस्वी उद्योजक म्हणून ख्यातनाम आहेत. मीडिया रिपोर्ट नुसार, माहेश्वरी हे इमेजेस बाजार Imagesbazaar या कंपनीचे सीईओ आणि संस्थापक आहेत.
ही स्टॉक पोर्टफोलिओ कंपनी संदीप माहेश्वरीच्या उत्पन्नाचा एक मेन सोर्स आहे. या व्यवसायातून त्यांना वर्षाकाठी करोडो रुपयांची कमाई होत आहे. 28 सप्टेंबर 1980 ला राष्ट्रीय राजधानी दिल्लीत माहेश्वरी यांचा जन्म झाला. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेले माहेश्वरी हे लहानपणापासूनच खूपच जिज्ञासू आणि हुशार आहेत.
त्यांच्या वडिलांचे नाव किशोर माहेश्वरी आणि आईचे नाव शकुंतला असे आहे. त्यांच्या शिक्षणाबाबत बोलायचं झालं तर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या किरोडीमल कॉलेजमधून त्यांचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी या कॉलेजमध्ये बीकॉम साठी ऍडमिशन घेतली होती. मात्र त्यांनी बीकॉम पूर्ण होण्यापूर्वीच शिक्षणाला ब्रेक लावला. मिळालेल्या माहितीनुसार बीकॉमच्या तिसऱ्या वर्षाला असताना काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी शिक्षण थांबवले.
किती कमाई करतात
मिळालेल्या माहितीनुसार माहेश्वरी यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात हेल्प सेंटर पासून केली. यानंतर त्यांनी काही काळ मार्केटिंग केले आणि पुढे मॉडेलिंग देखील केली. पण मार्केटिंग आणि मॉडेलिंगमध्ये त्यांना यश संपादित करता आले नाही.
यानंतर मग त्यांनी मोटिवेशनल स्पीच देण्यास सुरुवात केली. त्यांचे मोटिवेशनल स्पीचेस संपूर्ण देशात प्रसिद्ध झाले. यामुळे मोटिवेशनल स्पीकर म्हणून त्यांची ओळख झाली. त्यांनी युट्युब वर एक चैनल सुरू केला. यानंतर त्यांनी Imagesbazaar कंपनीची स्थापना केली. मीडिया रिपोर्ट नुसार ते प्रत्येक महिन्याला 30 लाख रुपयांची कमाई करतात.