… साहेब मला माझा पती परत आणून द्या…! महिलेचे पोलिस अधीक्षकांना साकडे

Published on -

Ahmednagar News : माझ्या पती विरुध्द कुठलीही तक्रार नव्हती तरीही पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून मारहाण केली. त्यामुळे त्यांच्या या त्रासाला कंटाळून पोलीस ठाण्यातून तीन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या माझ्या पतील परत आणून द्या.

अशी मागणी शेवगाव येथील एका महिलेने पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी , याप्रकरणी एक निवेदन दिले आहे की, माझ्या पतीला चार-पाच दिवसापासून तीन कर्मचारी सारखे फोन करून पोलीस ठाण्यात ये असे सांगत होते. शेवटी ३० डिसेंबर रोजी एका पोलीस अधिकाऱ्याने फोन करून धमकावून पोलीस ठाण्यात हजर रहा असे सांगितले.

या दिवशी ते पोलीस ठाण्यात सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होते या वेळेत माझ्या पतीला मारहाण केली. त्यावेळी माझ्या पतीने मला व दीराला फोन करून घडलेली हकीगत सांगितली व हा माझा शेवटचा फोन आहे. मी आत्महत्या करणार आहे असे सांगून फोन बंद केला आहे.

माझ्या पती विरुध्द कुठलीही तक्रार नव्हती तरीही पोलीस अधिकारी-कर्मचारी यांनी त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून मारहाण केली,त्यांच्या त्रासाला कंटाळून पतीने जर जीवाचे काही बरे-वाईट केले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी मारहाण करणाऱ्यांची राहील.त्यामुळे या सर्वांवर कारवाई करून माझ्या पतीला परत आणून द्यावे. अशी मागणी त्या महिलेने केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News