Health Tips: तुम्ही देखील ‘हे’ खाद्यपदार्थ फ्रीजमध्ये ठेवतात का? तर वेळीच व्हा सावध नाही तर होईल त्रास

Ajay Patil
Published:
health tips

Health Tips:- सध्या प्रत्येकाच्या घरामध्ये रेफ्रिजरेटर अर्थात फ्रीज आहे. त्यामुळे आपण या फ्रीजमध्ये वेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थांपासून तर भाजीपाला आणि उरलेले खाद्यपदार्थ देखील ठेवतो. बऱ्याच घरांमध्ये तर दोन-तीन दिवसांचे खाद्यपदार्थ फ्रीजमध्ये ठेवून परत ते खाण्यासाठी वापरले जातात.

काही काही खाद्यपदार्थ तर कित्येक दिवस फ्रीजमध्ये पडून राहतात. जवळजवळ ही परिस्थिती आपल्याला बऱ्याच घरांमध्ये दिसून येते. आपला फ्रिजबद्दल सहज असा समज आहे की  फ्रिजमध्ये तुम्ही कुठलाही खाद्यपदार्थ किंवा भाजीपाला ठेवला तर तो कित्येक दिवस खराब होऊ शकत नाही

व त्यानंतर तुम्ही खायला त्याचा वापर केला तरी कुठलाही विपरीत परिणाम होत नाही. परंतु खरंच ही सत्य स्थिती आहे का? याचा आपण कधीच विचार करत नाहीत. तसे पाहायला गेले तर फ्रीजमध्ये खाद्यपदार्थ हे बरेच दिवस ठेवले तरी खराब होत नाही ते खरे आहे.

परंतु याला काही खाद्यपदार्थ किंवा काही गोष्टी अपवाद आहेत व याबद्दलची माहिती आरोग्य प्रशिक्षक डॉ. डिंपल जांगरा यांनी दिलेली आहे. याच विषयी महत्वपूर्ण माहिती या लेखात घेणार आहोत.

 फ्रिजमध्ये हे पदार्थ ठेवण्याअगोदर वाचा ही माहिती

1- लसुन डॉक्टरांच्या मते, तुम्ही सोललेला लसूण कधीही उघडा किंवा रेफ्रिजरेटर मध्ये ठेवणे चुकीचे आहे. कारण त्याला बुरशी फार लवकर लागते व ही बुरशी तुमच्या आरोग्याकरिता घातक ठरू शकते.

त्यामुळे लसुन खरेदी करताना तो न सोललेला खरेदी करावा.घरामध्ये जेव्हा लसणाची आवश्यकता असते तेव्हाच त्याला सोलावे व त्याचा वापर करावा. लसूण ठेवताना तो सामान्य तापमानात ठेवावा.

2- कांदे कांदा हा नाशवंत असतो व त्यामुळे कांदा देखील बऱ्याचदा फ्रिज मध्ये ठेवला जातो. परंतु कांद्याचे वैशिष्ट्ये पाहिले तर कमी तापमानाला कांदा प्रतिरोधक असतो.

त्यामुळे फ्रीजमध्ये कांदा ठेवल्यानंतर त्याचा स्टार्च साखरेमध्ये बदलतो व तो बुरशी सारखा बनतो. अर्धा उरलेला कांदा फ्रिजमध्ये ठेवून देतात. त्यामुळे त्यात वातावरणातील अनेक आरोग्याला घातक असलेले जिवाणू प्रवेश करायला सुरुवात करतात. त्यामुळे अशा पद्धतीने कांदा फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे.

3- आले बरेच जण आले फ्रीजमध्ये ठेवतात परंतु आले जर फ्रिजमध्ये ठेवले तर त्यावर लवकर बुरशीचा प्रादुर्भाव होतो. याचा विपरीत परिणाम किडनी आणि लिव्हरवर होण्याचा धोका असतो. त्यामुळे आले ठेवताना ते सामान्य तापमानात ठेवणे गरजेचे असून नेहमी स्वच्छ ठेवले गेले पाहिजे.

4- भात ही एक सर्वसामान्य पद्धत असून प्रत्येक घरामध्ये रात्रीच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस उरलेला भात हा फ्रीजमध्ये ठेवला जातो व दुसऱ्या दिवशी देखील खाल्ला जातो. जवळजवळ प्रत्येक घरामध्ये ही परिस्थिती दिसून येते.

यामध्ये जर तुमच्याकडे फ्रिज शिवाय दुसरा पर्याय नसेल तर मात्र असा भात 24 तासांपेक्षा जास्त कालावधी करिता फ्रीजमध्ये ठेवू नये. नाहीतर आरोग्याला त्याच्यापासून नुकसान होण्याची शक्यता जास्त असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe