नगर जिल्ह्यात या ठिकाणी आढळले मानवी अवशेष

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : जिह्यातील पाथर्डी तालुक्यातील निपाणी जळगाव शिवारातील एका शेतात मानवी अवशेष आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यात एका हाताचा अर्धवट पंजा व एक हाताचे हाड सापडले आहे.

ही माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदरचे अवशेष डीएनए चाचणीसाठी नाशिक येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवणार आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, पाथर्डी तालुक्यातील निपाणी जळगाव शिवारात भोसले वस्ती आहे. तेथे एका शेतात एका अनोळखी व्यक्तीचा हाताच्या पंजाचा काही भाग व एक हाड सापडले आहे.

दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी जात सदरचे अवयव ताब्यात घेतले असून येथील उपजल्हिा रुग्णालयात नमुणे घेवुन ते डीएनए चाचणीसाठी नाशिक येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यिात येणार असल्याचे सांगितले.

दरम्यान येथील एका महिलेने एक पुरुष हरवला असल्याची तक्रार काही दिवसापुर्वी पोलिसात दाखल केलेली आहे. त्यामुळे आता या घटनेचे गुढ अधिकच वाढले असून पोलिस अधिकारी तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe